________________
प्रसंग पाचवा : ७५
तार असे निजमंदिर । जंगी सोहे तेचि नारी । स्वामि पावल्या लोकांतरि । कौसिकापरीते दिसतसे ॥ १८७ || तद्वाक्य ऐकोनि श्रवणि । भयभीत झाली निजमनि । गृहांतरि शीघ्र जाउनि । रत्नकरंडातून दीधला ॥ १८८ ॥ म्हने हा करंड घेवोनि जाइ । नृपालागि शीघ्र देइ । मम भ्रतारालागि वाचवि । न तरि बरवी गती नसे ॥ १८९॥ मग तो रत्नकरंड घेउन । राज्ञित दिधले आणून । द्यूतक्रीडा करोनि विसर्जन । नृपासि नेऊन दर्शविले ॥ १९०॥ करंड पाहोनि नरेश्वर । क्रोधे खवळला प्रधानावर । भूत्यासि आज्ञापिले सत्वर । म्हने बांधा तस्कर पापिष्ट हा ॥१९१॥ नृपाज्ञा पावोनि दूत । त्या श्रीभूतिप्रधानात ।
1
बांधोनिया कर्करित । क्षपिले त्वरित कारागृहे ॥ १९२॥
I
1
उक्तं च । काके शौचं द्यूतकारेषु सत्यं । क्लीबे धैर्यं मद्य तत्त्वचिता । सर्पेक्षांति स्त्रीषु कामोपशांति । राजा मित्रं केन दृष्टं श्रुतं वा १९३ भूप कवनाचा नव्हे मित्र । वायस कदा नव्हे पवित्र । मद्यपासी जिनसूत्र । वदता यत्र संभवेन ॥ १९४॥ मग प्रोहित आनि ज्ञानी जन । पाचारोनि पुसिले नृपान । चौर्यासत्यभासि त्यालागुण । प्रायश्चिस सांगणे काय असे । १९५ । ते सुज्ञानि आनि प्रोहित । विचारोनि प्रायश्चित्त ग्रंथ । वदते झाले नृपात । यासी प्रायश्चित्त त्रीणि असति ॥ १९६ ॥ स्थाल भरोनिया गोमय । भक्षण केल्या पाप जाय । वा द्वात्रिंश मल्लमुष्टि साहे । तरि नास होय दोस जेने ॥ १९७॥
२७. घुबड,
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org