________________
७६ : आराधना-कथाकोष अथवा हरोनि सर्वे धन । ग्रामांतोनि द्यावे काढून || हे प्रायश्चित्त असति तीन । पूर्वाचार्यान कथिले असे ॥१९८॥ मग त्यात काढोनि बाहिर । पुसता झाला नरेस्वर । हे विधादंड कथिले थोर । त्यात अंगिकार काय करिसि ॥१९९।। तो नपासि वदे सत्वरी । गोमय भक्षिण स्थालभरी। मग भृत्याने आनोनि लौकरि । त्याचे समोरी ठेविले ॥२०॥ येक दोन भक्षिता ग्रास । महत्कष्ट होति शरीरास । मग म्हने मुष्टि बत्तीस । मारविजे मस मल्लहस्ते ॥२०१॥ मग ते मल्ल त्यालागुनि । मुष्टि मारिता दोनि त्रीनि । रुधिर वमिले तत्क्षणि । लागिलि शारनि अधोद्वारे ॥२०२।। मग ग्लांत करी नृपाप्रति । देवा घेवोनि सर्व संपत्ति । जिवित्व द्यावे सेवकाप्रति । दया चित्ति आनोनिया ॥२०३॥ तद्वाक्य ऐकोनि नृपान । भांडारी घालोनि सर्व धन । काढोनि दिल्हे ग्रामातून । विप्र म्हणोन न मारिले ॥२०४॥ मग तो फिरे देशावरि । भिक्षा मागोनि पोट भरि । कष्ट भोगी नानापरि । सदैव करी आर्तध्यान ॥२०५।। आयुष्यंते मरोनि त्वरे । भूपतीचे भांडागारे । भुजंग होवोनि फुत्कार करे । निरंतरे भयदायक ॥२०६|| त्या समुद्रदत्ताची नृपवर । परीक्षा पाह्यासी सत्वर । तद्रत्नामाजि फार । स्वरत्नसार क्षपिले ॥२०७॥ स्वरे वाहोनि त्याप्रति । वदता झाला भूपति । जे तुझे रत्न असति । ते घ्यावे युक्ति वळखुनि ॥२०८।। तदा तो समुद्रदत्त ज्ञानि । नृपाचे आज्ञा करोनि । स्वकिय रत्न तितुक्यातुनि । सत्वर काढोनि घेतले ॥२०९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org