________________
प्रसंग पाचवा : ७३
।
तद्वाक्य ऐकोनि नृपाने | अभयाराज्ञिप्रति म्हने । याचे रत्न या कारने । मिळने हे दुर्लभ दिसे ॥ १६४ ॥ यान्हे जेव्हा ठेविले त्यापासी । त्यासि कोन्हि नसे साक्षी । कैसे मागावे त्याजपासी । शाहानपणासि दोस लागल || १६५॥ परीक्षावाचोनिया कार्यं । सुज्ञानि क्वचिन्न करावे । अविचार्य करिता जीवे । पश्चात्ताप होय ज्ञानियासि ॥ १६६ ॥ उक्तंच | अविचार्य न कर्तव्यं । कर्तव्यं च विचार्यतः । 1 पश्चातापं भवेत् पश्चात् । ब्राह्मनिन कुलो यथा ॥ १६७॥ नृपवाक्य ऐकोनि राज्ञि । वदत असे त्यालागुनि ।
मज आज्ञा द्यावी स्वामि । मी मंत्रिपासुनि रत्न काढितो ॥ १६८॥ भार्योक्ति ऐकोनि भूपति । म्हने त्वा करावि तद्युक्ति । जेव्हे रत्नाची होय प्राप्ति । ज्याचे त्याजप्रति देइजे ॥ १६९॥
राशि नृपाज्ञा घेऊनि । वदे समुद्रदत्ताकारन |
त्वा असावे समाधान । मिळतिल रत्न तुझे तुज ॥ १७० ॥ मग कौने येकिय दिवसि । सत्यघोष आनंदमानसि | आला राशिचे मंदिरासि । बैसला वंदनेसि करोनिया || १७१ ॥ मग त्या कारने वदे रानी । येक कौतुक असे मम मनि । सारिपाट खेळावे तुम्हि आम्हि । क्रीडे करोनि मंत्रिवरा ॥ १७२ ॥ तदा मंत्रि वदे स्वामिनीसी । माते जे तं आज्ञापिसि । ते ते करने सेवकासि । योग्यकार्यासी दासापरी ॥ १७३॥
1
मग खेल खेळति दोघेजण । राज्ञी पुसे त्या कारन । वा आज काय केले भोजन । ते मजकारण सांगिजे ॥ १७४॥ तो म्हने दाळ पोळचा भात । सेवया शर्करा दुग्धमिश्रित । वैंगणादि शाका बहुत । आनिक लोनकडे ॥१७५॥
घृत
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org