________________
७२ : आराधना कथाकौव
तदा येकिय दिवसि । दोन प्रहर माध्यान निसि । एवोनि राज्ञिचे मंदिरापासि । दीर्घ स्वरेसि करि पुकार ॥ १५३ ॥ तद्वाक्य ऐकोनिया राज्ञि । विचार करितसे मनि ।
म्हने हा गहिला नव्हे प्राणि । षड्मास वाणि येकचि वदे || १५४ ॥ मग ते वदे नृपाप्रति । स्वामि हा फिरतो दिनराति । याचे वाक्य धरावे चित्ति । हा गहिला दिसेचि ना ॥ १५५ ॥
ग्रामी फिरता निसदिन । षट् मास झाले याकारण । सदैव वदे येकवचन । क्वचिद्भीन्न न दिसे ॥१५६॥
गहिला फिरति ग्रामांतरि क्षण हासे क्षण रोदन करी । क्षण बैसे क्षण जनमंदिरि । प्रवेस करि उगलाचि ॥१५७॥ 1 कवनालागि सिव्या देति । भलतिसे वाक्य वदति । यद्वा तद्वा भविष्यति । वदावे त्या प्रति गहिला || १५८ || याची चेष्टा तैसी नसे । नित्य एकवचन भासे । हा कुमर महादुःखित असे । ते कोन नासे तुजविन || १५९ || पाचारोनि त्याकारण । त्वा पुसावे अभय देऊन । ऐकोनि त्याचे वचन । तत्कार्य साधन करी त्वरा ॥ १६० ॥ राशि वाक्य ऐकोनि त्वरा । पाचारिले श्रेष्ठिकुमरा । तदा तो यवोनि येकेसरा । नृपतिपुढारा उभा ठेला || १६१॥ भूप वदे रे न धरि भय । सत्यार्थवाक्य वदावे | व द्वास्तव्यज्ञाति काय । नाम काय मातृपिता ॥ १६२ ॥ नृपोक्ति ऐकोनि सिंधुदत्त" । पूर्विपासोनि वृत्तांत | सर्व व्यक्त केले नृपात । भयरहित होवोनिया ॥ १६३ ॥
२६. समुद्र.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org