________________
प्रैसंग पाचवा । ७१
जन वदति गा मंत्रिवर । तूं दिससी सत्याचा मंदिर । त्वत्सत्य वाक्याचा विस्तार । मेदिनिवर विस्तारिला ।।१४१।। तदा कुमरात वदे प्रधान । त्वा गमावोनि स्वकीयधन । धनबाय लागलि तुज कारन । गहिला होऊन जगि हिंडसी १४२ का झोंबिसि परक्याचे गला । रत्न मांगिसि वेळोवेळा । का पिसाट झालासि बाला । पाप प्रबला का जोडिसि ।।१४३।। जरि दरिद्र आल्या प्राणियासी । तरी न सोडावे सत्यासि । तो मान्य होय इंद्रादिकासि । कितिक भवासि जाय मोक्षा १४४ कुमर म्हने गा प्रधान । दुज्यासि संबोधाव्या कारण । विचक्षण असति सर्वेजन । परंतु आपन नाचरति ॥१४५॥ उक्तंच । विचक्षणं किंतु परोपदेशे। न स्वस्यकार्य सकलोपि लोकाः। नेत्रं हि दूरेपि निरीक्षितोपि । आत्मावलोकत्व समर्थमेव ॥१४६॥ मग तो वदे कुमरासि । कारे उद्धत वाक्य वदसि । किंचित्भय न मानिसि । लज्जा तुजसि का न वाटे ॥१४७॥ ऐसे वदोनि त्वरित । मागे लावोनिया दूत ।। धक्काबुकि गचाटया देत । काढिले त्यात गृहाबाहिरि ॥१४८।। मंत्रि सत्य वाक्याचि मात । विदित जाहाली भूपतीत । घोषणा देवविलि ग्रामात । वदावे मंत्रीत सत्यघोस ।।१४९।। मग तद्गृहा पासोनि कुमर । निघता झाला कुमर । ग्रामात फिरे निरंतर । करित पुकार दिन निसी ।। १५०।। म्हने ऐका हो सेटे महाजन । या श्रीभूति प्रधानान। अभलाकोनि पंचरत्न । मज मारोन बाहिर काढिले ॥१५१॥ घोषणा करिता रात्रंदिवस । झाले संपूर्ण षट् मास । कोन्हि न पुसे तयास । गहिला ऐसे वदति जन ॥१५२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org