________________
प्रसंग चवथा : ५३ देवा शंकर सौख्यदाता । पूर्वी सर्वान्न भक्षित होता । ते पात्र का उरते आता । वदावे त्वरिता आम्हा प्रति ॥६९।। मुनी म्हणे हो आइका तुम्हि । भूपतीचि भक्ति पाहुनि । तृप्त झाला शूलपाणि । स्तोकान म्हणोनि भक्षिति ॥७०॥ मुन्योक्ति करोनि श्रवण । नृपति सन्निध जाऊन । करिते झाले निवेदन । वर्तमान समस्त ॥७१।। रोसे ऐकोनि भूपति । म्हणे शिवभक्ता प्रति । तुम्ही पाहा त्या मुनिचि स्थिति । कैसे जेवविति देवशंकरा ॥७२॥ नृपवाक्य ऐकोनि भक्त । शिवमंदिरि येवोनि त्वरित । सर्वे विचार करिता व्यक्त । उपाय त्याहात आठविला ॥७३।। त्या देउळा माझारी । शुष्क पुष्परासी भीतरि । धूर्त लपवोनि सत्वरि । येवोनि बाहिरि सर्वे बैसले ॥७४॥ तदा समंतभद्र यति । युग्म कपाटे लावोनि देति । आपणचि भोजन करिति । धूर्त तद्वृत्ति पाहिली तदा ॥७५।। मग ते जावोनि सर्वजन । नृपासि केले निवेदन । राया नित्य पाठविसि अन्न । ते नित्य भक्षण करी योगि ॥७६॥ नृपति ऐकोनि उत्तर । क्रोधे खवलिला थोर । शिवमंदिरि यवोनि सत्वर । योगि तदुष्कर वाक्यवदे ॥७७॥ रे योगिया तू महादुष्ट । हृदि धरोनि थोर कपट । लावोनि युग्मकपाट । सर्वान्न उत्कृष्ट नित्य भक्षिसि ||७८|| ईश्वर करिति भोजन । म्या ऐसे अंतरि जाणून । चरू करोनि नित्य नूतन । प्रीति धरोन नित्य धाडिले ॥७९।। तदन्न भक्षोनि निरंतर । पुष्ट केलेसी कलेवर । शिबातन करिसी नमस्कार । दिससी थोर अहंकारी ॥८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org