________________
७२६ । आराधना कथाकीर्ष महाक्रोधाग्नि बलान्वित । नेत्र ताम्र धूम नीघत । ते पाहोनिया भयभीत । त्वरे करीत पलायन ।।१२९।। दूर गेला चंपापुरीसी । वर्तमान सांगे रायासी । तुम्ही द्विगुणबळ त्यासी । तुमचे राज्य घेईल ।।१३०।। राया विषाद हर्षवदन । सांगसी पोरि खेळवन । कैसा बलाढय तो पाहीन । करावे रे सैन्यतयारी ॥१३१॥ करकंडु तो येरीकडे । सैन्ये मेळ उनीया गाढे । विद्याधर विमानारूढ । आले दडदड चंपापुरी ।।१३२।। नगराबाह्ये उद्यानवनी । महावीर सुभटाग्रणी । रणवाद्य नाद किंकिणी । नाद गगनी न समाय ।।१३३॥ दंतीवाहन वीरश्रीय । चतुरंगा सेना समुदाय । रणांगण मेळा समुदाय । दोन्ही बाह्ये वीर उन्नत ॥१३४॥ तदा व्यूह प्रतिव्यूह । रचना केली अर्जुनसुत । दाखला पांडुपुराणात । पद्मपुराणात लवांकुश ।।१३५।। तदन्याय ते पद्मावती । जानोनिया त्वरितगती । विमानारूढ महासती । पवनगती चंपापुरी ॥१३६।। विमानवासी पद्मा सुंदर । युद्ध होतसे घोरांदुर । करकंडु तो विद्याधर । सिंहा तिळभर होउ नेदि ॥१३७॥ दंतीवाहन क्रोधानल । बाण लाविला अग्नीजाल । वरून बाण सोडी बाळ । शांत अनिल ठाई च ॥१३८।। राव बाण पंचविषय । ते तरुणांगी भेदले राय । धाणाहि लोका जितोनिय । करकंडु राय देखिला ।।१३९।। बाळ सकुमार ब्रह्मचारी । त्याच बाण तो काय करी । बाण छेदला वरचेवरी । राजेंद्र चूरी दोन्ही कर ।।१४०।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org