________________
प्रसंग एक्कावन्नावा । ७२५
राजचिन्ह लक्षण युक्ती । विद्याधर विमानी पाहती । करकंडु क्षितिवरौती । महोत्सव पाहती स्वेच्छा ॥ ११७।।। महा गज तो सुंडादंड । विलोकिले नर उदंड । दृष्टि पडता करकंड । पाहिला प्रचंड राजेश्री ।। ११८ ।। तेजस्वी आणि रूपवंत | कळसाभिषेक तयात । जयस्वी शब्द गर्जनात । गजेंद्र ठेवित मस्तकी ।।११९ ।। अनेक वाद्याचे गजरी | मिरवत आले राजमंदिरी । विधीयुक्त सिंहासनावरी । जनपरिवारी स्थापिले ।। १२० ।। जय जय शब्द महोत्सव । वाद्ये वाजती अपूर्वं । करकंडु राज्यवैभव । श्रीजिनदेव पुष्प पूजने ॥ १२१ ॥ तत् क्षण बालदेव खेचर । पालनपिता विद्याधर । पाहोनिया तो राज्यभार । विद्या सिद्धी सार संतुष्ट ।। १२२॥ पद्मावती सती ते माय । विमानी बैसोनिया स्वय । विद्याधरी सहित स्वय । केले अक्षय अक्षवान ।। १२३ ।। तदा तो करकंडु बळी । निःक्षती राज्य भूमंडळी । देवपूजा जिनराउळी | राजा बळी सुखसंतोष ।। १२४ ।। तत् प्रताप ऐकोनिया । दंतीवाहन क्रोध हृदया | मम राज्यासी दिने धनिया । करावे त्वया उपायासी ॥ १२५ ॥ दूत धाडोनिया सत्वर । त्वरे ते हस्तिनागपूर ।
करकंडुसी नमस्कार | समाचार सांगे रायासी ।। १२६ ।। आमचा प्रभु बळवान । नाम त्याचे दंतीवाहन | तुम्ही त्याची सेवा करून । राज्य करण एकछत्री ।। १२७ ।। वचन ऐकोनी तयाचे । मन क्षोभले तयाचे ।
रे रे दूत घेईन त्याचे । राज्य अवधे मीच मी ॥। १२८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org