________________
७२४ : आराधना - कथाकोष
अहो पुत्री ऐक वचन । दीक्षेचे न दिसे कारण । तीन वेळा दीक्षा घेवोन । व्रतखंड न पूर्वजन्मी ॥ १०५ ॥
पंचविषय तारुण्यमद । व्रतखंडन पापबंध |
तीन वेळा दुःखदारिद्र्य । भोग विविध भोगिले त्वा ।। १०६ ।। तत् कर्म शांत व्हावयासी । पुत्रराज्य पाहे नेतेसी | चौथ्याश्रमी परिवारेसी । दीक्षा तुजसी होईल हो । १०७ ।। ऐकोनिया गुरूवचन । चित्तासी जाले समाधान | गुरू अर्जिकासी नमन । स्वस्थ मन पुण्याश्रित ।। १०८ ।। तथा तो बाळदेव खग । विद्या सिकवी कळा अंग | करकंडु पुण्य संयोग । कुशलांग सहस्रभट ।। १०९ ।। एकदा करकंडु विमानी । विद्याप्रचीत पाहे नैनी । हस्तिनागपुरा येवोनी । क्रीडा स्मशानी खेळतुसे ।। ११० ।। तत् पूर्वकथा अनुसार । जयभद्र मुनीविहार । शिष्य समवेत परिवार स्मशानांतर वनभूमी ॥ १११ ॥ तेथे देखोनिया आश्चयं । वेळ जाळित वेळुलय । नरकपाल मुखलोचनय | अनुपम सुंदर ते ।।११२।। शीष म्हणे वो गुरुराया । महत् कौतुक दिसे स्वामिया । शीषवचन ऐकानिया । सांगे तया जयभद्र मुनी ।। ११३ || हस्तिनागपुरे राजिंद्र । होणार असे वलभद्र । अंकुश दंड आणि छत । त्रीणि पवित्र राजमुद्रा ।। ११४ ।। तेथे ब्राह्मण एक होता । श्रवण केली स्वामी वार्ता | द्रव्यलोभे मनाआतौता । छेदि त्वरिता वेळतय ।। ११५ ।। घेवोनिया आला गृहासी । कित्येक दिन होता त्यासी । करकंडु आला विलासी । हस्ती सैन्यसी फिरे ग्रामी ।। ११६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org