________________
प्रसंग एक्कावन्नावा : ७२
ऐकोनी देवीचे वचन । तत्समीप आलो धावोन । मातंग वेश मी धरोन । सर्व निरोपण केले म्या ॥९३॥ ते ऐकोनिया पद्मावती । द्वीविसदिन निर्भयचित्ती । संतुष्टमान सरळचित्ती । बीजचंद्र युक्ती वृद्धीबाळ ॥१४॥ तेव्हा तो वदतु खेचर । माते चालावे मम मंदिर । बाळ खेळवी मनोहर । विद्या समग्न विमानसिद्धी ।।१५।। विद्याधर विमानी बैसला । बाळ वोसंगी घेत याला । कनकमाळा स्त्रीन घेतला । बाळ देखिला सूर्यप्रभा ॥९६।। कमळचिन्ह करि कंडु । नाम तयासी करकंडु । आजानबाहु तो प्रचंडु । बाहुदंडु वीरश्रीयतो ।।९७।। विमानारूढ परिवार । व्योमव्यान ते चाले स्थिर । क्रमेण प्राप्त विद्युत्पुर । सर्वांतर महाआनंद ।।९८।। अहो भव्य पूर्वपुण्येन । जीवा कष्टे पि सुखसंपन्न । विपत्ति संपत्ती शक्तीन । जिनगुणपुण्य आचरा ।।९९।। पुण्य सुपात्रदानेन । पुण्य श्री जिनपूजन । पुण्य व्रतनेमे करून । सुखसंपन्न करिती यासी ।।१०।। पुण्य इंद्र साह्य करिती । खेचर भूचर पद्मावती। दुष्ट कर्म दूर होताती । सुखोत्पत्ती त्या पुण्यवंता ।।१०१।। तेव्हा ते पद्मावती सती । अजिकाबाई गांधरीमती । पाहोनी पुण्योद्भव चित्ती । वैराग्य उत्पत्ती मनात ।।१०२।। तियचे माघ चैत्याल्यात । देववंदना स्वामिनाथ । अवधीज्ञानी समाधीगुप्त । नमोस्तु युक्त मुनीराया ।।१०३।। करयुगुळ जोडोनिया । दीक्षा द्यावी जी गुरूराया। तत् वचन ऐकोनिया । सांगे अवधिया हिताहित ॥१०४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org