________________
७२२ : आराधना कथाकोष
तेथे प्रसूत जाली सती । दिव्य पुत्र पुण्यान प्राप्ती । कर्मसंयोग जीवा होती । विचित्रगति विधिचेष्टित ॥८१।। तत् समयी मनुष्य एक । नमन करी बोले मुस्क । माते मी तुमचा सेवक । रक्षावया बाळक आलो मी ॥८२।। ऐक माते तू मम वाणी । खगाचळ दक्षिण श्रेणी । नगरी विद्याधर गुणी । सुभाषणी ते विद्युत्पुर ।।८३।। विद्युत्प्रभ विद्याप्रचुर । विद्युल्लेखा त्या स्त्री सुंदर । तयचा मी असे कुमर । नाम शरीर बालदेव ॥८४।। एकदा विमानी बैसोनी । कनकमाला मम कामिनी । स्वइच्छेन क्रीडा करोनी । आकाशगमनी भ्रमतु ये ॥८५।। रामगिरि मार्ग पाहिला । विमाना अटकाव झाला । तेथ उतरता देखिला । ज्ञानी भला वीर भट्टारक ।।८६।। मी मूढ उपसर्ग त्या करी । पद्मावती आली सत्वरी। पार्श्वनाथ मस्तकावरी । तत् चरणांघ्रि षट्पदवत् ॥८७।। उपसर्गात निवारूनिया । विद्या छेदल्या मम तया । क्रोधनेत्र रे दुष्टा त्वया । केले वाया साधूपीडन ॥८८।। विद्या छेदिता ते समस्त । भंग जाला विमानात । निर्बळी जालो मी अशक्त । शरणांगत नमस्कारी ।।८९।। माते मी अज्ञानभावेन । उपसर्ग केला मूढपन । आता मी तुजला शरण । विद्या देण मज देवते ।।९।। दयावंत ते पद्मावती । शांत होउनी मज वदती । ऐक रे मम वचनोक्ती । जा सीघ्रगति नागपुरा ॥९१।। श्मशानि बाळ आनि माये । त्याचे रक्षण त्वा करावे । रे खग त्या बाळाप्रभावे । विद्या सर्व प्राप्त होतील ||९२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org