________________
प्रसंग एक्कावन्नावा : ७२१
महाअरण्यी गज प्राप्त । स पद्मा नृपति भयभीत । गुरूमंत्र हृदयात । द्रुमशाखेत कवटाळि ॥६९।। वृक्षाखालुत उतरोन । मार्गे चंपापुरी जाऊन । फूलमाळ यान ते पाहोन । भगिनी म्हणोन संरक्षिली ॥७०।। भव्यजीवासी पूर्वपुण्य । संकटी रक्षण उपाय । येरीकडे दंतीवाहन राय । हाहाक्कार स्त्रिय पद्मिनी वो ।।७१।। मम मनाची मनरंजनी । मज एकटचि टाकुनी। हृदयस्फोट जळ नैनी । महाशोकाग्नि धडकला ॥७२।। तदा विद्वत जन चतुर । संबोधिला तो नृपवर । जैन धर्म सौख्यकार । शोक अंतर न करी राया ।।७३।। दंतिवाहना सीतोपचारी । श्रीमत् जिनतत्त्वविचारी । सज्जनी संबोधिला वक्त्री । चंदनापरी सुखस्थित ॥७४।। तेव्हा तो हत्ती मदोन्मत्त । वनदेशात उल्लंघीत । दक्षिण दिशा तया प्राप्त । तळ विश्रांत तडागी तो ।।७५।। त्या तडागे तो ऐरावती । पाहिला तो जळदेवती । त्याची करोनिया तत्शांती । जळि क्रीडति सुखस्थिता ।।७६।। यानंतरे चंपापुरीसी । पद्मावती शोकमानसी। माळाकार संबोधी तीसी । खंत मानसी न करि माय ।।७६।। ते ऐकोन पद्मावतीते । बोलली त्या धर्मबंधुते । हस्तनागपुरी मज तेथे । ने उनी स्वस्थ मज ठेवी ।।७८।। माळाकार म्हणे गे माय । मम गृही स्वस्थ असावे । शुभाशुभ ज्ञानी संशय । घरस्त्रीसी स्वय निरोपी ॥७९।। एके दिनी गेला कार्यासी । त्याची भार्या पद्मावतीसी । द्वेष करोनी परदेशी । स्मशान भूमीसी गेली ते ।।८०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org