________________
७२० : आराधना-कथाकोष
भास्कर देखिला स्वप्नात । प्रजापालन जगन्नाथ । कृष्ण सांगे सद्गुरूनाथ । हर्ष चित्तात पद्मिनीचे ।।५७।। अथ तेरपुरे गोपाळ । धनदत्त बुद्धी सरळ । तळयात पोहता शेवाळ । शरीर गुंडाळे सर्वही ।।५८।। नि बुडाला त्या सेवाळात । देव उत्कृष्ट हृदयात । अठविताची प्राणमुक्त । पद्मा गर्भावतार ।।५९।। गोपाळाचा मृत्य जानोनी । श्रेष्ठी वसुमित्र येवोनी । त्याचा संस्कार करोनी । वैराग्य मनी उत्पन्न त्यासी ॥६०।। नमोस्तु सुगुप्ती मुनीराया। दीक्षा घेतली भव तराया । घोर तपात करोनिया । स्वर्गठाया सुख भोगिती ।।६१।। येरीकडे चंपापुरीसी । पद्मावती ते सुमानसी । डोहाळे मनी उद्भवती । विद्युल्लता मेघवर्षणि ॥६२।। हस्तीवरौत बैसोनिया । नृप रूप धरोनिया । अंकुश छत्र घेवोनिया । स्वलीलया नगरबाह्ये ।।६३।। चतुरंग सैन्य घेवोनी । स्वेच्छा क्रीडा करावी वनी। डोहाळा राणीचा जानोनी । करि करणी दंतवाहन ।।६४।। वायोवेग रायाचा मैत्र । तो आलासे वेग वगत्र । खेचरी विद्या जाने मंत्र । मेघडंबर चपलान्वित ।।६५।। सर्व सेना करोनी सीघ्र । सालंकृत्य महागजेंद्र । रूढ होउनीया सुंदर । वीर सूर वाजंत्री वाद्ये ॥६६।। महोछाय मेघ गर्जत । सेवक अद्य समन्वित । अहो स्त्रियचे मनोरथ । आश्चर्य वाटत ज्ञातिया ॥६७।। तदा कर्मोदय करोनी । पूर्व वैर हस्ती स्मरोनी । अंकुशाचे घाव न मानी । चालला अरण्यी वेगात ॥६८।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org