________________
प्रसंग एक्कावन्नावा: ७१९ कन्या देखिली रूपवंती । पद्मडोही सापडली ती । नामाभिधान पद्मावती । दिमप्रति यौवन भर ॥४५।। एकदा रायाचा प्रधान । पद्मा पाहे रूपलावण्य । सभे बैसला दंतीवाहन । तयासी जाउन सांगतु ॥४६।। राय पाहोनिया त्वरित । मनोहर ते गुणवंत । मनरंजन कामभरित । फुलमाळयात पुसतसे ॥४७।। माळि म्हणे वो राजधरा । हे प्राप्त पद्मसरोवरा । नाम साजे पद्मा सुंदरा । संदोखाआंतरा होति हे ।।४८।। मंजूस दाविला रायासी । राजमुद्रा पाहिली त्यासी । पत्र वाचिताची रायासी । दंतिवाहनासी आनंद ।।४९।। विधियुक्त विवाह केला । सती पद्मावती रायाला । पटराणी मान दिधला । सर्व सुखाला पाहताती ॥५०॥ कित्येक दिवसापर्यंत । वसुपाळ राजा पुण्यवंत । दर्पणि पाहे रोम श्वेत । निशान हे सत्य यमाचे ॥५१॥ विधा वैराग्य ते उत्पन्न । राज्यपदी दंतीवाहन । जिनमंदिरासी जावोन । पूजा न्हवन अष्टविधि ॥५२॥ स्वामिपासी कर जोडोनी । दीक्षा मागे भवतारिणी । संजमभारासी घेवोनी । तप तरनी तीव्रतपे ॥५३॥ दंतीवाहन भूपति । शामराज्ये राज्य करिती। धन धान्य संतत संपत्ती । धर्म आचरति जिनोदित ।।५४॥ एकदा सती पद्मावती । पश्चिम रयणी स्वप्नस्थिती। गज भास्कर महादीप्ती । रायाप्रति पुसे रमणी ॥५५।। राजा राणी चैत्यालयासी । स्वप्नफळ पुसे स्वामिसी । सिंहदर्शन क्षत्रवंशी । ऐरावतासी एकछत्री ।।५।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org