________________
७१८ : आराधना-कथाकोष
तियच्या कन्या आणिक दोन । धनवती धनश्री षड्गुण । रूपलावण्य जैसी पद्मीन । की इंद्रभुवन अप्सरा ॥३३॥ अथ नागानंदपुरात । धनपाळ वणिक् सुत । धनवती स्त्री रूपवंत । विधियुक्त ते परनिली ॥३४॥ तथा वत्सदेश विख्यात । कौशांबी नगरी असे त्यात । वसुमित्र श्रेष्ठी विख्यात । धनस्त्री तयात अपिली ॥३५॥ तयचे सुमंगतीन । धनश्रीचे पुण्ययोगेन । श्रुत्वा धर्म जिनेंद्रेन । श्रावकीन नागदत्ता ते ॥३६।। युगुळ कन्या महाप्रीती । स्नेहे करोनी येती जाती । मात्यापित्यासी रंजविती । संतोषचित्ती उभयता ॥३७॥ तव कवने एके दिनी। भावरी आले महामुनी। नवविधा पुण्य जोडोनी । मुनीवचनी घे अणुव्रत ॥३८॥ नागदत्ता तदा गृहासी । जाता बौद्धमति तयसी । कुधर्मध्यान उपदेशी । नय मानसी तय चेते ॥३९।। जैन धर्म सत्य सत्य । सर्वसुखा नि आत्महित । दृढ धरोनिया चित्तात । आयुष्यांत कालांतरे ॥४०।। शेष पुण्य कौशंबी नगरी । वसुपाळ रायाचे घरी । पुत्री जन्म पापपदरी । कुनक्षत्ती कुदिवसी ते ।।४।। तदा राया तय कन्येसी । घालोनिया पेटिमंजूसी । नाममुद्रिका पचित्यासी । यमुना नदीसी सोडिली ॥४२॥ गंगासंगमी वाहता ते । कुसुमाख्य महापुरात । पद्मडोहो होता जेथ । माळाकार तेथ देखली ॥४३॥ फुलमाळी नामाभिधान । पेटारी स्कंधी ते घेवोन । गृहस्त्रियापासी देऊन । काय हे म्हणोन पाहती ॥४४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org