________________
सँग एक्कावन्नावा : ७२७
राये सोडिला क्रोधबाण | शांति धरिली कुमरान । बाणामागे सोडी बाण | कुमरा मौन जपे नौकार ॥ १४१ ॥ राजा घालित बाणजाळा । तेची होताती पुष्पमाळा । विमानी पाहे पद्मा बाळा | हृदयी कळवळा दोही पक्षी || १४२ ॥
तत् समयी पद्मावती । भ्रतारासन्मुख तिष्ठती ।
राव ते पाहोनिया चित्ती । वोळख पुरती स्फुरेना ।। १४३ ॥ म्हणे हे कवनाचि कवन । की स्वर्गाची देवांगन | किंवा हे शेषाची पद्मीन । काय सून दशरथाची ।। १४४ ।। की हे षोडश सतीत सती । किंवा रुक्मिणी स्नुषा रति । अथवा कर नेत्रावर्ती । न्याहाळून पाहती तीते ।। १४५ ।। तेव्हा ते पद्मीन सुंदर । विनंती करि जोडोनी कर । म्हणे मी त्वं दासी किंकर । ऐकावा समग्र वृत्तान्त || १४६ ।। श्रवण होता करुणा शब्द राव हृदयी जाला स्तब्ध | म्हणे हे काय बोले मुग्ध । श्रवण शब्द ओळखिली || १४७||
कंठ दाटला हुंदक्यान । नेत्री चालले ते जीवन | पल्लव लावोनी नयन । दुःख मागोन आठवले ।११४८।।
राव आक्रोश करि चित्ती । प्रधान सज्जन समजाविती । शोक शांत हृदय स्फूर्ती । पद्मा सती ते आलंगिलि ।। १४९|| पद्मा म्हणे तुमचा नंदन । ऐरावती जैसा भान । संग्राम तो स्थिर करोन । पुत्रा कळल वर्त्तमान | हत्तीवरोन उतरला ॥। १५० ।।
पित्यासन्मुख येवोनिया । करकमळ जोडोनिया | करकंडु लागला पाया | महाविनय करी क्लान्त ॥ १५१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org