________________
७०४ : आराधना-कथाकोष
प्राप्तिहार्य नि महाभक्ती । नानापरीची वाद्ये होती । जनपद आश्चर्य पाहती । सती सती सत्य सत्य हे ।।९३॥ अहो हो भव्या पुण्याश्रित । व्यंतरदेव पूजा करीत । कीर्ती विस्तारली जगात । शीलवत निश्चय करोनी ॥९४॥ शीले महाग्नी जल होय । सागरी शील तरणोपाय । शत्रुलीनता शरण य । विष होय अमृतासम ।।९५।। शीलवत पाळिती सदा । पूण्यनिर्मळ सार संपदा । अंती भोगिती इंद्रपदा । मोक्षपदा अनुक्रमेण ॥९६॥ तस्मात् शील जिनेंद्रोक्त । सर्वपापविनाश युक्त । मनोमर्कट हस्तगत । पाळावे पंडित बुधजनै ॥९७।। तत् शीलाची ऐकोनी ख्याती । तो उग्रसेन महीपती । पश्चात्ताप हृदि करिती । देवा मी मतिहीन असे ।।९८।। तत् समय वना अतौता । वैराग्यभाव धरी चित्ता। क्षमाभाव करी समस्ता । पुढे चालता मुनी पाहे ॥९९।। त नाम्ना गुणधरो धीर । स अवधि तो ज्ञाननेत्र । त्रिपरीत्य नमोस्तु वक्त्र । पूर्व भवांतर पुसतसे ।।१००। वृषभसेना म्हणे स्वामी । मत् भवांतर सांगा तुम्ही । शुभ अशुभ कर्म आम्ही । दयानिधी तुम्ही सांगावे ॥१०१।। देखोनी सतीचा भावार्थ । मधुरगिरा शब्द अर्थ । श्रुणु पुत्री भवसूत्रार्थ । शुभाशुभ पदार्थ पूर्व ।।१०२।। ब्राह्मणागृही तुझा जन्म । नागस्त्री तेथे तुझे नाम । राजगृही करिता काम । मुनींद्र उत्तम तेथे आले ॥१०३।। सहज सायंकाळ जाला । मुनिदत्त तेथे बैसला । गर्तेत ध्यानारूढ जाला । उभा ठेला कायोत्सर्गी ॥१०४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org