________________
प्रसंग पन्नासावा : ७०५
त्वा अज्ञानभावे करून । कैसा येथे उभा नगिन । कैसा आला लष्करातून । राजा पाहुन मज कोपेल ।।१०५।। सडा संमार्जन करोनी । मुनीवरे टाकी दुरोनी । केरपुंजा तो झाडोनी । मुनी बुजोनी टाकिला पै ॥१०६।। ते मुनी धीरवीर गंभीर । अचळ जैसा गिरीवर । परीषह सहति थोर । अचळ थिर मेरूसम ।।१०७।। संमार्जनेन जगत्पूज्य । मुनी परमार्थी महाराजे । तयाचा द्वेश करिती जे । कुबुधी जे जे मूढत्रये ।।१०८।। प्रातःकाळी उठोनी राजा । पाहत चालला सहजा । आश्चर्य पाहे हे केरपुंजा । उश्वास आवाजा निःश्वास ।।१०९।। तेथे उभा राहोनिया राये । अहो हो हे आश्चर्य काय । यात पाहुया आहे काय । काढिती समुदाय हळुच ।।११०॥ तेथे मुनीराज पाहिला । सेनान केरान वेष्टिला। हाहाक्कार राजा दचकला । पापाचा जाहला गजब ॥१११॥ राजा गहिवरे अंतर । त्यान धरोनिया स्वकर । उचलोनिया स्वमंदिर । आत्मनिंदा फार करीतसे ।।११२।। शुद्ध काया करोनि त्वया । औषधदान करी विनया । मुनी शांत होवोनिया । आशिर्वाद राया देतसे ।।११३।। वैय्यावृत्य राजा करीत । स्वकरे चरण चुरीत । तेव्हा ब्राह्मणी येऊनी तेथ । पश्चात्तापात आत्मनिंदा ।।११४।। निदेने पाप दूर गेले । स्तुत्वा मुनीसी नमस्कारिले ।
औषधदान बहु दिले । ते कामा आले तुज बाई ।।११५।। किंचित् पाप राहले होत । ते भोगणे आले गे तूत । शब्ददोषेन कळंकात । राजहस्ते दूर सर्वही ।।११६।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org