________________
प्रसंग पन्नासावा : ७०३
द्रव्याची आशा दाखवोन । मेघपिंगळ वश करोन | उग्रसेना मंदिरा नेवोन | सभा सदन सामंत ते ॥ ८१ ॥ दान मान पाहुणचार | वस्त्रभूषण अलंकार । रत्नकंबळा पीतांबर । बरोबर रानीवासात ||८२|| वृषभसेना सती तेथ । पापी पाहे तो उन्मत्त । सती समजली अंतरात । दासीसहित सभास्थानी ॥८३॥ मेघपिंगळ भार्या दासी । वस्त्र बरोबर सर्वासी । ते कर्तृत्व सर्व रायासी । सांगे दासी त्या रायचेष्टा ॥ ८४ ॥ ऐकोनी उग्रसेनराय । क्रोध धडकला हृदय । प्रधाना बोलाविले स्वयं । पिंगल पलाय त्वरेन ॥८५॥ दूर गेला तो देशावर । दुर्जन कपटी अंतर । जाता धरती न दे थार । पापी नर नरकगामी ते ||८६ | उग्रसेन पाहे स्त्रियासी । म्हणे स्त्रिया ऐसी कैसी । योग्यायोग्य न कळे इसी । दासदासी समसमान ॥ ८७ ॥ अविवेक क्रोध करोनी । अनिष्ट शब्द बोले वचनी । सती धरोनी स्वयं पानी । समुद्रजीवनी टाकू पाहे ॥८८॥ धिक्कार क्रोध ज्या प्राणिया । मूढ जीव मिथ्यामतिया । राज्यमदात करोनिया । विचार तया नसे युक्त ॥ ८९ ॥ सती समजली अंतरी । प्रतिज्ञा सर्व संन्यासकरी | उपसर्ग होती नानापरी । पंचनमस्कारी दृढतर ।। ९० ।। जरी दूर होईल विघ्न । तरी निश्चय दीक्षा घेईन । दुष्ट कर्म क्षय करीन । तेन पावन स्वर्गमोक्ष ||११|| तदा ते सती शुद्धमनी । शीलाचे प्रभावे करोनी । जळदेवताब्धिजीवनी । सिंहासनी करी पूजन ||१२||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org