________________
७०२ : आराधना कथाकोष
त्वरे आला उग्रसेनापासी । बोले नर्मोत्तर राजासी । ह्या स्तळ निर्मिले तुम्हासी । चला वेगेसी दानसाळे ॥६९।। सती म्हणे न जाउ तेथे । स्वस्थता राहु आम्ही येथे । कुजनी म्हणे राहा येथे । रुचेल तेथे रहावे तुम्ही ॥७०।। तथा भावार्थ प्रीतियुक्त । वरपंगी बोले तो नुक्त । जे वृंदावन अभ्यागत । वर्तुळ दिसत सुंदर ।।७१।। तेव्हा त्या पृथ्वीचंद्रान । उभयता वस्त्रभूषण । वृषभसेना संतोषान । परिणामेन सरळचित्त ।।७२।। सतीसन्मुख जावोनिया । नमस्कार करी विनया । महादरे रंजवी तया । रत्नकांबळीयाअन्वित ।।७३।। पश्चात् प्रणाम करोनी । अमोल वस्त्रे पुढे ठेवोनी । वृषभसेना मम मनी । अंबिका पद्मिनी सम्यक्त्व ।।७४।। देवी त्वत् दर्शनेन मया। सफल झाली मम काया । नानाप्रकारे तो विनया । सख्यत्व माया लावितसे ।।७५।। त्याची पाहोनिया भक्ति । संतोष पावोनिया सती । नित्य नित्यशः भक्तियुक्ती । सन्मान सन्मतिपूर्वक ।।७६॥ उग्रसेना विनय करून । ग्रामशोभा पाहा नयन । सामंत सांगात घेवोन । सोकासन वृषभसेना ॥७७॥ पंचकोसी काशीनगर । पाहोनिया शोभा समग्र । पार्श्वनाथ जिनमंदिर । भेलापुर मध्यभागी ।।७८।। देवदर्शन पापनाशन । अष्टविध पूजार्चनेन । सर्व सौख्याचे ते कारण । मोक्षमार्ग न प्रभावना ॥७९।। पृथ्वीचंद्र तो भूपति । रूपवंत पाहोनी सती । मनी तळमळ त्या चित्ती । प्रधानाप्रति मंत्र सांगे ॥८॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org