________________
प्रसंग पन्नासावा : ७०१
नारायण दत्ताख्या मंत्री । एकांत सांगे हृदयसूत्री। उग्रसेनाची सुंदर स्त्री । मम नेत्री दाखवावी तुम्ही ॥५७।। तत् कारणात् धर्मशाळा । रचना मनकर्णिके स्थळा । यात्रेस बोलाउ भूपाळा । करू सकळा पाहुणचार ॥५८|| तया समवेत ब्राह्मण । वाराणसीसी संतर्पण ।। अन्नच्छत्र ते दानपुण्य । राजा पाहोन संतोषती ॥५९॥ ऐकोन रायाचे उत्तर । प्रधान म्हणे नोव्हे बर । राजा बलाढय त्याची नार । सती सुंदर शीलवंती ॥६०॥ परनारी अग्निसमान । कुटुंबे जळाला रावण । द्रौपदी छळ कौरवान । बुडाले जान एकोत्तरशे ॥६१॥ अरेरे तू प्रधान कैचा । नेत्रविकासी क्रोध ठसा । मम कार्य न करी सिद्धसा । दंडीन सहसा तुजसी ॥६२।। प्रधान म्हणे शांत व्हावे । तुमचे मनाचे करावे । त्यासीच पत्र पाठवावे । सख्यत्व करावे प्रीतीने ॥६३॥
रायाच मन स्छिर केले । प्रधान कुडत्र योजिले । ब्राह्मणहस्ते पत्र धाडिले । यात्रेस आले पाहिजे हो ॥६४॥ ते ऐकोन उग्रसेनान । यात्रे चालला आनंदान । वार्ता ऐकिली रूपवंतीन । मजला टाकोन कोठे गेले ।।६५।। धात्री म्हणे अहो हो बाई । तुमची कीर्ती ऐकिली सई । राजकर्तृत्व सांगु काइ । वाराणसी जाई त्वरेन ॥६६॥ वृषभसेना लाग वेग । स्वपतीचे पावली माग । स्वामी का हो भरला राग । माझा वियोग का हो केला ? ६७॥ दोघ विनोद हर्षासह । वाराणसीसी स्थळ गेहे । स्वसमुदाय तेथे राहे । पृथ्वीराय हे समजले ॥६८।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org