________________
६९८ : आराधना कथाकोष वृषभसेनाख्या पुण्यबाळी । जनरोग सर्व निर्दाळी । पूर्वाजित ते पुण्यबळी । पदजळि व्याधीनाशन ॥२१॥ अक्षिज कुक्षिज महारोग । शीरोज खास पूर्वभोग । कन्याचिय न्हवनयोग । कुष्ट रोगादि दूर होताती ॥२२।। तथा एकदा उग्रसेन । दोघे मंत्री ते विचक्षण । रनपिंगल तो सज्ञान । दुजा जान मेघपिंगल ।।२३।। सर्व सेना तयार केली । वनक्रीडेसी ते निघाली । राज कायारोगे वेष्टिली । मनरंजविली प्रधानाते ॥२४।। पश्चात् स्वगृहा येत येता । गुरू भेटले ज्ञानवंता । नमस्कारिले भाव चित्ता । रोगहर्ता तव दर्शने ।।२५।। तेथोनि पुढती चालले । कन्येचे माहात्म्य ऐकिले । न्हवनजळे रोग गेले । बंधू कोपले प्रधानावरी ।।२६।। स्त्रीचे न्हवन विष जान । कैसा रोग तो निवारण । प्रधान म्हणे ते पुण्यवान । रोग दहन कित्येकाचे ॥२७॥ असो रोग निवारणार्थ । येता जाला तो ग्राम जेथ । मान अभिमान गुप्तार्थ । स्वसामर्थ उतरले ते ॥२८।। रनपिंगळ महाज्ञानी । सेटीचे गृहा तो जाउनी । जल मागे विनय करोनी । रोगनाशनी द्यावे बुधै ।।२९।। तदा धनस्त्री भीतभीत । कन्यान्हवन जल मागत । स्वामी द्याहो तुम्ही किंचित् । रावरौत रोग नासेल ॥३०॥ ते ऐकोनी सेटि बोलले । तुम्ही पाहिजे पुण्य केले । प्रधान म्हणे सांगा वहिले । ते कबूल जाले उग्रसेन ॥३१॥ सत्यं कन्याजळे करोनी । दिव्यरूप रोग नाशनी । जरी ऐकला मम वानी । रोग नासुनी जातील सर्वे ।।३२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org