________________
प्रसंग पन्नासावा : ६९९
एवं प्रधान म्हणे त्यासी । काय आज्ञा सांगा आम्हासी । जे आवड तुमचे मानसी । सांगावे वेगेसी ते पुरउ ॥३३॥ आधी दावा आम्हा प्रचीत । जळ द्यावे तुम्ही त्वरित । कोन्ही द्यावे आम्हा सांगत । सत्यसत्ये तू भाक घेइ ।।३४।। तोय दिले कळस पाणि । धात्री घेत शीघ्रगमनी । रायाचे सन्निध येवोनी । मस्तकी पाणी प्रक्षाळिले ।।३५।। दिव्यदेही जाहला राव । आनंद हृदयी न समाव । दासी सांगे वृत्तान्त सर्व । रूप अपूर्व कन्यकेच ।।३६।। तेव्हा तो राजा आपण । सेटिच्या गृहासी येवोन । मान सन्मान टाकोन तेन । बैसला येवोन अंगणी ।।३७।। सेटी धनपती सद्बुधी। मानसन्मान करी आधी। बैसोनिया तया सन्निधी । कुशळविधी क्षेम पुसतु ॥३८।। राजा म्हणे तुमचे गृही । येता जालो हो दिव्यदेही । धन्य तुमची पुण्यदेही । जिनेंद्र साही पूजाप्रभावे ॥३९॥ धन्य ते पुण्यरूपशाली । जलस्पर्श तो रोग टाळी । पुण्यकीर्ती विस्तारली । ते आम्हा दिधली पाहिजे ॥४०॥ म्हणाल आम्ही व्यापारी वाणी । समतुल्य होय कैसे नि । गीतगंगा ऐसे जानोनी । करावे पाणिग्रहण वेगी ॥४१।। ऐकोन रायाचे वचन । श्रेष्ठी बोले निश्चियमन । जिनेंद्रभुवनी जावोन । करावे पूजन देवाचे ॥४२॥ ज्या देवासी पूजिती इंद्र । चंद्रार्क नरेंद्र खेचर । अष्टान्हिक तो नंदेश्वर । पूजा समग्र विधियुक्त ॥४३॥ सप्तक्षेत्री धन खर्चावे । जीर्णोधारण करावे । पशुपक्षी बंध सोडावे । पुण्य जोडावे निहिंसक ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org