________________
प्रसंग पन्नासावा : ६९७ दातृ पानृ यथास्थित । सप्तगुणी ज्ञानची युक्त । तत् फळ कोणा वर्णवेत । तीन जगात पुण्यकीर्ती ॥९॥
औषधदानाचे जे फळ । वृषभसेना प्राप्त जाल । पूर्वाचार्यानी जे वणिल । म्हाराष्ट कथिल गुरूकृपे ॥१०॥ जंबूद्वीप भरत क्षेत्र । जिन जन्मभूमी पवित्र । देश जनपद विचित्र । श्रावक सत्पात्र नांदती ।।११।। कावेरी नगरी उन्नत । उग्रसेन राजा पुनीत । प्रजा पुनापरी पाळीत । संतत संपत सर्व सुखी ।।१२।। तेथे श्रेष्ठी तो धनपति । जिनेंद्र पदार्चन मती । त्याची भार्या ते महासती । धनमती षड्गुणभार्या ।।१३।। पूर्वाजित पुण्य करोन । शीळवंत रूप लावण्य । तत् पुत्री वृषभसेनेन । जैसी लावण्य इंद्रबाळी ॥१४।। तयसी रूपवंत दासी । नित्य सुश्रूषा करी त्यासी । स्नान आभरण ज्ञानासी । रंजवी सर्वासी गुणजे ।।१५।। एकदा वृषभसेनेन । स्नानवारि ने भरनेन । पुढे गर्ता पाहे नयन । देखिल श्वान रोगपीडित ।।१६।। ते पाहोनिया नयनी । दासी न्हवन कन्येच आनी । श्वानावरी सिंचिता पानी । तत्क्षणी निरोग जाल ।।१७।। विस्मय माता पिता करी । धात्री म्हणे हे रोगानिवारी । पुत्रीचे न्हवन ज्याचे सीरी। पडता दूरी रोगनाश ।।१८।। तत् चमत्कार पाहावयासी । तत् माता ते अंध ऋषी । कन्ये जीवन नेत्रा स्पर्शी । पाहे नयनासी सुंदरा ।।१९।। द्वादशवर्षे नेत्रहीन । जल लाविता दिव्य नयन । निसि अंती तो जेवि भाल । प्रकाशपूर्ण धरातळी ॥२०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org