________________
प्रसंग एकोणपन्नासावा : ६९३
श्रीषेण राजा तो भूपति । कपिला बोलावी त्वरिती । राजापोनि क्रोधयुक्ति । मान खालुति न बोलेची ।। १६० ।। जे दासीचे करिती सेवन । पुण्यहानि द्रव्यहनन । शेवटी नर्कासी पचन । चौन्यांशी भ्रमण पुनःपुनः ।। १६१।। नृप बोलाविले भृत्यासी । गर्दभारोहण दुर्जनासी । पिटाविला दूरदेशासी । सीलहि नासी सुख कैचे ।।१६२।। सर्वांनी प्राचित घेतले | कित्येका पश्चात्ताप जाले । सर्वासी पाप समजले । निश्चित राहिले गृहाश्रमी ॥ १६३ ॥ एकदा पुण्ययोगकर्ता । राजपुत्र रत्नाकर कर्ता । गुणज्ञ शास्त्रज्ञ पवित्रता । सुख संपता सर्व सुखी ।। १६४ ॥ चारणमुनी दोघे जन । आकाशमार्ग त्याचे गमन ।
रायाचे गृहासी येवोन । भावरी कारण तिष्ठले ।। १६५ ।। आदित्यगति अरिंजय । राजा पडघावी विधित्रय । नवविधानि पंचाश्चर्यं । अन्नदान स्वयं दातृपात्र ।।१६६।। राय अन्नदान दिधले । रत्न पुष्प इंद्र वर्षिले । दुंदुभी वायु साधुभले । पुण्य जोडले नवविधा ।। १६७।। तया पुण्ययोग करोन । सर्व सुख भोग भोगुन । धातकी खंड जन्म घेन । जन्म घेन भोगभूमीसी ।। १६८ ।।
धर्मध्याने देह ठेविला । उत्तर कुरू देहे धरिला । पुण्य भोग पुण्य आयुला । राज्य कुळीला उत्पन्न ते ।। १६९ । । ते दोघे राजे सत्यभामा । महासती जेवि ते रमा । उत्पन्न जाली राजधामा । भोगभूमौ उत्तरकुरू ।। १७०॥ तेथे तो दश कल्पतरू । दशप्रकार तत् विस्तारु । पुण्यप्रताप महाथोरू । पुण्याचा अधारू जीवासी ।।१७१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org