________________
६९२ : आराधना कथाकोष
धरनीजट तो ब्राह्मण । पापी दरिद्री पीडापूर्ण । रत्ननगरासी येवोन । सांगे वर्तमान कपिलाचे ।।१४८॥ मग तो आला त्या ठायासी । दुरोन पाहे दासी पुत्रासी । संतप्त होवोनी मानसी । आनंदसी विषाद मनी ॥१४९।। पिता पाहताची सत्वर । उठोनी केला नमस्कार । माता पिता बंधु समग्र । चंद्रोपवेंद्र कुटुंबेसी ।।१५०।। क्षेमकुशल पुसोनिया। मानसन्मान करोनिया । स्नान भोजन सारोनिया । देति विडिया तांबूलादि ।।१५१॥ वस्त्रादि सर्व उपचार । करोनी बैसले सादर ।। पृच्छा करिती जोडोनी कर । हा ब्राह्मण चतुरज्ञानिया ।।१५२।। आचार विचार शास्त्री तो । अर्थज्ञानी विचक्षण तो । परंतु मलीन भासतो । विचारवंतो सत्य सांगा ।।१५३।। तव तो दरिद्री ब्राह्मण । मम पुत्र सांगे सत्येन । सत्य ठेविले लपउन । ज्ञान असोन पापी नर ।।१५४।। एवं कित्तिका वासरे। दारिद्रयासी पाहुणचार । मिष्टान्न भोजन आदर । धनादिवस्त्र संतोषविला ।।१५५।। माता पिता सत्यभामया । सत्य सांगा हो द्विजराया। असत्य दरिद्र दुःख वाया । सत्य सत्य सखया वदावे ॥१५६।। याची आहे दुष्टवासना । दृष्टान्त कडु इंद्रावना । ते ऐकोनिया त्या ब्राह्मणा । सत्यसूचना गृहासी गेला ।।१५७॥ त्याचे ऐकोनी उत्तर । राजासी कळला समाचार । ज्ञात मिळोनिया समग्र । शास्त्रविचार प्रायश्चित्त ।।१५८।। सत्यभामा ते कुळवंती । नपा न जानोनि याचिती । कन्या राहे निर्भयचित्ती । देवगुरूभक्ती करोनिया ।।१५९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org