________________
प्रसंग एकोणपन्नासावा : ६९१ तयाची सुता सत्यभामा । सुखी नांदती पुण्यधामा । तथा विप्र अचळग्रामा । ज्ञानोत्तमा धरनिजट ।।१३६।। इंद्रभूत्याग्नी तयो पुत्र । ज्ञानी सद्गुणी तो पवित्र । तयासी एक दासीपुत्र । कपिलानेत्र कमलाक्ष ।।१३७॥ तद्वेदध्यायनकपिला । गूढव्रती न तो सिकला। वेद वेदांग पार जाला । बुधीबळाला बृहस्पति ।।१३८।। ग्रंथार्थी तो महाव्युत्पन्न । दासीसुत त्या कोन म्हन । किंकर सर्व लोकजन । बुद्धी कर्मानुसारणी त्या ॥१३९॥ सर्व ब्राह्मण पाहोनिया । क्रोधाग्नि जल्पताति तया। धरनीजट विप्र तया । अयोग्य त्वया किं कृत्वारे ॥१४०।। अरेरे दासीपुत्र होसी । वेद-गायत्री पढतोसि । क्रोधे पीटला परदेसी । ज्ञानवंतासी काय उने ।।१४१।। कपिला निघाला तो त्वर । ग्रामदेश पाहे नजर । विप्ररूपेण आला सीघ्र । रत्नपूर सत्वर ययौ ॥१४२।। सात्यकी विप्रान पाहिला । ब्राह्मण ज्ञानी तो कपिला । ज्ञानवंत वेद पढला । बृहस्पतिला शोभे शिष्य ।।१४३।। जानोनी योग्य तो ब्राह्मण । कन्या दिधली परनुन । सत्यभामा रूपलावण्य । खुशी अंतःकरणामध्ये ।।१४४।। ते दोघ रमण रमणी । सुख भोगिती निशीदिनी । राज सभेसी तो जावोनी । व्याख्यान पुराणी मनोहरान् ।।१४५।। एवं स्वल्पच दिवसासी । ऋतु प्राप्त सत्यभामेसी। संयोग होता त्या दोघासी । कुचेष्टा मानसी जाने स्त्रिया ॥१४६।। कोन्हाचा पुत्र काय कुळी । पापात्मा हा दिसे अकुळी । मानसी दुःखिस्त वेल्हाळी । त्यजी तत्काळी धूर्त वेश्या ।।१४७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org