________________
६९० : आराधना कथाकोष
श्रीषेण अन्नदान केले | वृषभसेने औषध दिले । सूकरसेन अभय दिले । कौंडेस केले शास्त्रदान ।। १२४ || त्याची कथा पुण्यपावन । सांगतो मी अनुक्रमान | श्रोते हो व्हावें सावधान । मोक्षमार्गान जावयासी ॥ १२५ ॥ प्रथम आहारदानकथा | सुपुत्रासी कौंडेश दाता । सुख शांतिस शांतिकर्ता । पात्रानि दाता यथास्थित ।। १२६ ।। जय श्रीशांतिनाथदेव । भुक्तिमुक्तिराज्यवैभव । नवविधा पुण्य जोडाव | सार्थक कराव जन्माच ।। १२७॥ पुण्येन पुराण पुरुष । तत् चरित्र सुख संतोष । भाविक जना ममी हर्ष । सुखविशेष कोट्यावधि ।। १२८ ।। जंबूदीप दक्षिण दिशि । भरत क्षेत्र पुण्यरासी । जिनमंदिर ध्वजा आकासी । पूजा देवासी अष्टविध ।। १२९ ।। पुण्य जोडिती ते अपार । शास्त्र अति धीर वीर । दाता भोक्ता शुद्ध विचार । भक्तीतत्पर देवगुरू ।। १३०|| मलयाख्य देश सुंदर | रत्नसंचय त्यात नग्र | श्रीषेण राजा तो चतुर । धर्मी तत्पर अतिप्रीति ॥ १३१ ॥ तत् प्रिया ते सिंहनंदिनी । द्वितीया नंदिरूपिणी । जैसी इंद्राची इंद्रायणी । रूपलावण्यमंडित त्या ।। १३२ ।। तयो द्वयो अनुक्रमेण । पुत्र दोघे जाले उत्पन्न | इंद्रसेन उपेंद्रसेन । बलसंपन्न धनुर्धर ।। १३३॥ संतत संपत परिवार । श्रीषेण राजा धीर वीर । पुत्रवत् प्रजा ते समग्र । धर्मधुरंधर प्रतापी ॥ १३४॥ तत् ग्रामी सात्यकी ब्राह्मण । ज्ञानवंत सभारंजन | अर्धांगी सुंदर कामीन । जंब्वाख्या सद्गुण शीळवंती ।। १३५ ।।
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org