________________
प्रसंग एकोणपन्नासावा : ६८९
उत्कृष्टपात्र जिनधर्मी । तत् तुल्य सहस्र परधर्मी । एक कल्पतरूचे समी । अरण्यधामी असंख्यात ।।११२।। श्लोक:-उत्कृष्टं मुनिनाथश्च मध्यमं श्रावकस्तथा । ज्ञेयं पात्रं जघन्यं तु सदृष्टिजिनभक्तिभाक् ।।११३।। उत्तम पात्र मुनीराय । मध्यम श्रावक तो होय । ज्ञानदृष्टी श्राविकादय । जिनराय भक्ति तत्पर ॥११४।। इति त्रिविध सुपानासी । धार्मिके दान द्यावे त्यासी । पावती अनंत सौख्यासी । पुण्यवंतासी काय वर्ण ।।११५।। कांति कीर्ती-आरोग्य काया । रूपसौभाग्य पवित्र जाया । धनधान्य सुपुत्र कन्या । षट्कायदया उच्च गोत्र ।।११६।। सप्तक्षेत्री धन खचिती । देव गुरू विनयभक्ती । पूर्ण आयु शास्त्रज्ञ श्रुति । दीक्षा घेती चौथ्याश्रमी ॥११७॥ तप तीव्र कर्म खंडून । इंद्रचक्री नागेंद्र होण । राज्यपद सौख्य भोगोन । नाना कल्याण दिने दिने ॥११८॥ सुपात्रदान करोनिया । अनंत सौख्य होय तया । मोक्षरमणी प्राप्त जाया । नाभिरायानंदनवत् ॥११९।। ऐसे पात्रदानाचे फळ । जाना भव्य जीव सकळ । तुर्य दान करा निर्मळ । जेन अचल पद प्राप्त ।।१२०।। चार दान पुण्य अनंन । न वणे मतिमंदात । साह्यकारि गुरू समर्थ । पंचगुरूत तयाविना ॥१२१।। तथा स्वर्गी इंद्रपुरीसी । सभे पुसती मुख्येंद्रासी। भूमंडळी ऐशा गुणासी । पुण्यरासिदाता क्वचित् ।।१२२।। श्रीषेण आणि महीसेन । सम्यक्त्वी तो वृषभसेन ! कोंडेशो नि वराहसेन । चार दानात विख्यात ॥१२३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org