________________
६९४ : आराधना कथाकोष
उक्तं च । मद्यातोद्यविभूषास्त्रग जोतिदीपगृहागकाः । भोजनामत्र वस्त्रांगा दशधा कल्पपादपाः ।।१७२।। रसांग पाणि विभूषण । सुवर्ण आदि दीपरत्न । गृह भोजन पाक पूर्ण । दिव्यवस्त्र मिळुन दहा ।।१७३॥ तेथे नाही रोग शोक । चिंता नाही दारिद्रय दुःख । न अल्पमृत्यु जरा रंक । वैरी सर्प भयंकर नसे ॥१७४।। शीतबाधा नसेचि उष्ण । नाही युद्ध नसे दुर्जन । मान नाही माया कारण । मन मोह न ते तिष्टती ।।१७५।। कित्येक दिवसपर्यंत । पूर्व पुण्य सुख भोगित । अन्नदान त्या सुपात्रात । संतत संपत पुण्ययोग ॥१७६।। धर्म दश लक्षणी केला । चौथ्याश्रमी जोग घेतला। तपे कर्माचा क्षय केला । अंती स्वर्गी इंद्रजन्म ।।१७७।। सोळा वर्षाचा देहधारी । द्वादश वर्षाच्या त्याच्या नारी। स्वरूपसुंदर कुसरी । विमानांतरी देववंदना ॥१७८।। चिरकाल इंद्रपदभोग । सुपात्रदानाचे नियोग । तो श्री सीखेन पुण्यसंजोग । मध्यभाग अवतरेल ॥१७९।। अनेक सुखासी भोगुनी । आयुष्याती स्वर्गा जाउनी । सर्व सुख भोग भोगुनी । मध्यमेदनी तीर्थंकर ॥१८०॥ जंबूद्वीप भरत क्षेत्र । सिद्ध भूमी पुण्यपवित्र । तेथे ते हस्तिनागपुर । प्रताप थोर पुण्यधर्माचा ।।१८१।। तेथे राजा तो विश्वसेन । इरावती स्त्रिया सद्गुण । तत् कुशी गर्भावतरण । पंचकल्याण शांतिनाथ ।।१८२।। ऐसे जानोनी भव्यलोक । पात्रदान करावे सुरेख । पुण्यकीर्ती प्राप्त द्विलोक । जिननायक सखा करा ॥१८३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org