________________
प्रसंग एकोणपन्नासावा : ६८७
विविध वैराग्य उत्पन्न । प्रीतिकर सद्बुद्धिवान । संसार अस्थिर जाणून । दुःखकारण भवभवी ॥ ९० ॥ शरीर कुश्चळ अपवित्र । पीडा व्याधि त्या मळमूत्र | सुखदुःखी तत् स्त्रियापुत्र । संसारचरित्र निर्यबंध ॥ ९१ ॥ माता पिता बंधु सज्जन । माया मोह महादारुण । बारा अनुप्रेक्षा पाहून । सर्वकल्याण मोक्षदाई ||१२|| देवासी पंचामृत - पूजा । विधियुक्त चढवी ध्वजा । चतुर्विध ते संघ पूजा | मुक्तिकाजा भव्य करिती ॥९३॥ सप्त-क्षेत्रासी अपि धन स्वतः लक्ष्मीचे प्रमाण | पुवासी स्वगृही स्थापून । संश्रुति-न्याय व तत्त्ववित्तु ॥ ९४ ॥ बंधुवर्गासी पुमोनिया । सर्व आप्तसज्जना तया । क्षमाभाव अस्तु द्या मया । दीक्षा द्यावया आज्ञा दिजे ||१५|| राजगृह विपुळाचळी । महावीर जिनेंद्र बळी |
मस्तक तत्पदकमळी | बियांजुळी दीक्षा घेतली ॥९६॥
तथा तो तपस्वी दुर्धर । हृदय रत्नत्रय-धीर । शुक्लध्यान आणिजे समोर । करी संहार धातिचतुष्टय ||९७॥ केवळ ज्ञान उत्पादक । लोका-लोक-प्रकाशक । इंद्र- नागेंद्र - नरेंद्रादिक । खेचर-चंद्रार्क पूजिति ||१८||
जगौपदेश धर्मामृत | जग- त्रिताप-निवारत । भव्य जीवा संबोध होत । सुख संपत्त सर्वजीवा ॥९९॥ शेष कर्मास निवारोनि । सिद्धपदाब्धि अष्टगुणी । प्रीतिकर तो मुक्तिस्थानी । अनंतज्ञानी सुख शांतय ॥ १०० ।। इति प्रीतिकर स्वामीचे । चरित्र केले अनुवाचे । ऐकताची भव्यजीवाचे । इच्छिता तयाचे कार्यसिद्ध || १०१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org