________________
६८६ : आराधना-कथाकोष
त्रिः परीत्य पदक्षिणा । मुनिचा करी विनय नाना । मांसदोष टाकी रे मना । अंतःकरणापासोनिया ||७८ || कित्येक दिवसानंतर । जंबुक भावार्थ तत्पर । मुनीपद ध्यान अंतर । अस्त दिवाकर न घे पाणी ॥७९॥ एकदा जाला क्षुधावंत । शुष्काहार जळरहित । काया क्षीण पानी न दिसत | तृषाकान्त पुण्यवान तो ॥८०॥ वनि होती एक बारव । मनात म्हणे नीर प्यावे । सोपान उतरता पाहे । अंधःकार होय अंतरी ॥८१॥ म्हणे दिनअस्त जाला बरे । येता सूर्य पाहिला ।
अस्त जाता तम दाटला । संध्याकाळ झाला म्हणतु ||८२|| तम दाट बारबाहिर । तोचि जाणावी संध्यारात । नेम दृढ अस्त दिनकर । आत बाहेर येता जाता ॥१८३॥ | स्मरता गुरूचे चरण । संसार - सिंधुते तारण । मृत्वा व्रत धर्मध्यानेन । जन्म जाण श्रावकवंसी ॥ ८४ ॥ कुबेरदत्त ते पुण्यवान । धन-मित्र स्त्रिया सगुण । तत्पुत्र प्रीतिकर सज्ञान । नाना - संपद्गुण विराजे ॥ ८५ ॥ चमगधारी बलबान । रूपमंडित जैसा भान । ऐसा भव्य जानोनि मन । व्रतकरण दृढतरपै ॥ ८६ ॥
ते ऐकोनि भाविकजव । पूर्वोक्त श्रीगुरूवचन । धर्मशर्म कर्ता भगवान । रात्रि भोजन त्यक्त कृत्वा ॥८७॥
तथा प्रीतिकर भाविक । ऐके भवांतर सात्विक । धर्मं तो दशलक्षणिक । धरि विवेक जिनमार्गी ॥८८॥ प्रीतिने नमोऽस्तु स्वामीसी । मग तो चालला गृहासी । व्रतस्मरण हृदयासी । झाला उदासी प्रपंचाला ॥। ८९ ।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org