________________
प्रसंग एकोणपन्नासावा : ६८५
पुनः प्रीतिकर भक्तीयुक्ती । नमोस्तु करी मुनीप्रती । अहो करुणानिधिपती । पूर्वजन्मस्थिति वदावी ॥६६।। ते ऐकोनिया मुनीराय । हृदि अवधीज्ञानमय । एकचित्ते ऐकावे भव्य । पुण्यउपाय मी वदतो ।।६७।। सुप्रतिष्ठ नाम नगरी । त्या उद्यानवनाभीतरी । मनी येता सर्व नगरी । सह परिवारी राजादयो ॥६८॥ भेरी मृदंग नि कंसाले । महावाद्ये वनासी आले । त्रिःपरीत्य पद पूजिले । सन्मुख बैसले श्रवणार्थी ॥६९।। तदा त्या वाजंत्र्याचा नाद । श्रुत्वा जंतु हृदयानंद । श्रावक घेवोनी आशीर्वाद । नमुनी मुनींद्र गृहंगता ।।७०।। तोच जंतु मनि चिंतित । अभक्ष्य भक्षितो वनात । जंबुक येवोनी त्वरित । देह टाकीत मूमिवरी ॥७१।। जातिस्मरण त्या होवोनी । स्वामी समज अंतर्ज्ञानी । हा तो भव्यजीव म्हणोनी । मोक्षगामीनी जंतु हा ॥७२॥ अरेरे पापी पूर्वजन्मी । धर्म नाही केला रे तुम्ही । धिक् धिक् तू जन्मभूमी । पाप धामी नरक भोगसी ।।७३।। जरी व्रत घेसि जानोन । तरी तू होसी पुण्यवान । हे ऐकानिया शृगालान । मुनीवचन आत्महित ॥७४।। मुनीसन्मुख बैसे शांत । जानोनी मुनी वदे त्यात । दुर्बळ दिसती अशक्त । जैनव्रत कैसा करिसी ॥७५।। तू तो पापी मांसाहारी । त्याचा त्याग करिसी जरी । सोप व्रत एक आदरी । रात्री न करी आहारासी ॥७६॥ गुरूची आज्ञा पाळोनिया । व्रत अंगीकारील तया । नमन करी गुरूपाया । वर्जतया रात्री भोजन ।।७७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org