________________
६८४ | आराधना-कथाकोष
मद्यमांसाष्ट मूळगुण । पंच उंबर मकार तीन । जो न पाळी अधमगुण । तोचि भाजन नरकीचा ||५४ || पंच अनुव्रत पाळावी । तीन गुणव्रत ते घ्यावी । चत्वारी शिक्षाव्रत पाहवी । चालवावी पंडितै भव्यैः ||५५ ॥ रात्रीभोजन मांसाहार । चर्म तोय घृत असार ।
तैल हिंग मध अपवित्र । चर्मपात्रातील न घ्यावे ॥५६ ।। सप्तव्यसन न करावी । चोरी जारी मन त्यजावी । मारि मांस अहारी टाकावी । न पहावी परस्त्री वेश्या ||५७|| जुवा सप्तम ते व्यसन । स्त्री हरविली पांडवान | महारुद्र त्या पार्वतीन । अपकीर्ती भाजन जगात ||५८|| कंदमूळ अखाद्य वस्तु ज्यात वसति जीवजंतु । महायत्नेन जो पाळितु । जळ गळितु बुधोत्तमैः ॥ ५९ ॥ नित्य दान दे सुपात्नासी । अष्टविध पूजा देवासी । तिथि पर्वणि उपवासी । पुण्यरासी वटबीजवत् ||६० || करावी श्रीजिनेंद्रभक्ती । तेन च स्वर्ग मोक्षप्राप्ती । पूजा अभिषेक करिती । इहलोकी कीर्ती परलोकी ॥ ६१ ॥ प्रथम तोय इक्षुरस । करिती सिंचन सुरस । अर्चिती जिनदेवास। इंद्रसभेस माननीक ॥६२॥ कृत्रिम अकृत्रिम विधी । करिता प्राप्त सुखनिधी । तत् प्रतिष्ठा यात्रा आधी | दुर्गति छेदी करणीक ||६३|| इत्यादि धर्म तो सद्भाव । ऐकिला सर्व सुखठेव । अंतकाळी जे भव्यजीव । निश्चय देव तेचि सम्यक्त्व || ६४ ॥
ऐकोनी मुनीवचन । द्विधा धर्म सुखसंपन्न | भव्यं व्रतनेम घेवोन । करी साधन गुरूपदेशे ॥ ६५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org