________________
प्रसंग अठ्ठेचाळीसावा | ६७५
श्रेणिक रूपात पाहोनी । चेलना निश्चय करी मनी । मम देहाचा हाचि धनी । नमोकार मनी स्मरतसे ।। २५३ ।। सुरूंग मार्ग गावातून । तिघी कन्या सवे घेउन । चंदना जेष्ठा परतून | नेम निमित्या न गेल्या त्या ।। २५४ ॥ चेलना अभयकुमार । पातले राजगृहनगर । विवाह मंगळगजर | संघ चतुर अन्नदाने ।। २५५ ।। चेलना पट्टस्त्री सुमती । अभया सुमित्रा ते सती । पूर्वीचे पुण्यसुखप्राप्ती । राजनीति प्राणवल्लभा ॥ २५६ ॥ तथा श्रेणिक मिथ्यामत । चेलना जिनभक्तिरत । कुधर्म सुधर्म म्हणत । कुदेव भक्त न करावी ।। २५७ ।। कुगुरू मंत्र नच ध्यावा । कुशास्त्रार्थ न आईकावा । सुधर्मे होय पुण्यठेवा | सिद्धान्त ऐकावा स्वहिता ।। २५८|| परस्पर वाद करिती । स्वस्वधर्म प्रशंशिती ।
I
तव एक्या दिवसाप्रती आले बौधमती राजगुरू ।। २५९ ।। श्रेणिक म्हणे वो चेलना । मम प्रिय कुळमंडना । पतिव्रते पतिचे वचन । शब्द उल्लंघना न करावी ॥ २६०॥ आमचे गुरू आले घरा । भोजन घालावे सुंदरा | विष्णुभक्ता ज्ञान अपारा । विनय करा भक्तीभावे ।।२६१।। ऐकताची चेलना सती । त्वरा केली पाकनिष्पत्ती | पाचारिले ते बौधमती । येवोनी बैसती ध्यानस्थ ॥२६२॥ धानस्थ ते अवघे जन । एक शीष पाहे चक्षुन । त्यासी पुसे ते मृगनयन । चातुर्यपन बोले शिष्या ॥ २६३ ॥ | कुश्चळ देह मळलिप्त । टाकुनी गेले वैकुंठात । विष्णुपदी जाले ध्यानस्थ । सर्वसौख्यात ते तिष्टती ॥ २६४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org