________________
६७४ : माराधमा कथाकोष
सदा संतोषोनि नृपती । प्रीत्या देवार्चन करिती । देवासन्मुख पसरीती । कन्येच्या मूर्ती सात चित्र ।।२४१।। भावपूजा श्री जिनेंद्रनी । सर्वस्व कल्याणदायिनी । भक्तिभाव करा नित्यानी । भव्यजनी मनरंजनी ।।२४२।। एकदा चेटकरायान । सर्व सैन्य सज्ज करोन । राजगृही उद्यानवन । योग्यस्थान ते उतरले ॥२४३।। तेथे जिनपूजाविधान । महामहोत्सव विधीन । पट्ट पसरिला तयान । कन्यारत्न ते हेमवर्णी ।।२४४।। चार कन्या विवाह झाल्या । चेलना जेष्टा चंदनेला । श्रावकी वर पाहिजे त्याला । मिथ्या श्रावकाला न देती ॥२४५।। . ते ऐके श्रेणिक राजेंद्र । अशक्त जाला हृदयात । मदनव्याकुळ भूमींद्र । त्या मुखचंद्र उतरला ।।२४६।। पुत्र बोलाविला अभय । पाहू आता त्वत् चातुर्य । या शरीरा स्त्रीरत्न होय । पहावी सोय ज्ञाननिधी ।।२४७।। मंत्री पाठविला त्यापासी । कन्या द्याव्या वो राजियासी । सोध पाहता कुधर्मासी । मिथ्यामतीसी देववेना ।।२४८।। अभयकुमार ऐकोन । चित्ती विचारी करावा यत्न । पट लिहिला अभयान । चित्र सिंहासन श्रेणिकादि ।।२४९।। वाणिज्ये वृषभ भरोनी । विशालाढ्या नगरी जावोनी । नगर उद्यानी राहोनी । मंडपस्थानी पट्ट स्थापी ।।२५०।। पूजा न्हवन जिनेंद्रासी । ग्रामलोक आले पाह्यासी । दान मान तुर्यसंघासी । दिधले ज्ञातिसी भोजन ॥२५१।। पट्ट पाहोनी सर्वजना । धार्मिक वणिती सद्गुणा । ऐकोनी चंदना चेलना । हर्षल्या मना जेष्ठा देवी ।।२५२।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org