________________
प्रसंग अठेचाळीसावा : ६७३ मिरवत आले राजेश्री । स्वस्थ जाले राजमंदिरी । पूर्वपुण्याची ऐसीपरी । पुत्रपोत्री ते सर्वसुखी ।।२२९।। अभयमती सुमित्रासी । प्रधान अनिक ज्ञानशास्त्री। पंडित कळादि सुमंत्री । षड्शास्त्री ते सिद्धान्तमार्ग ।।२३०।। ऐसे कर्मीता कित्येक दिन । पुढे कथा अनुसंधान । सिंधुदेशे सुविचक्षण । शोभायमान ग्राम विशाळ ।।२३१।। चेटक राजा पुण्यवंत । जैनधर्मी तो महासंत । राणी सुभद्रा रूपवंत । पुत्री गुणवंत सप्तम ।।२३२।। प्रथम पवित्रा प्रियकारिणी । तत् पुण्यवर्णी नसे कोणी । मृगावती मृगनयनी । द्वित्री भामिनी सुप्रभा ते ।।२३३॥ प्रभावती ते तुर्यबाळी । चेलना पंचमी गुणागळी । जेष्ठा षष्ठी रूपा आगळी । स्वरूपावली चंदना ते ।।२३४।। अनुपम स्वरूप धन्य । देवांगना त्या न सामान्य । रूप-शीला-क्रिया-निपुण । सप्त सती मान्य बालिका ।।२३५।। नृप चेटक महाराज । पुत्रीचा स्नेह धर्मकाज । मिथ्याती निर्भत्सी सहज । सत्यार्थी दीजे नेमयुक्त ।।२३६।। कन्येचा पटरूपरेखा । चित्रकारासी म्हणे रेखा । रेखोनियाते चित्र देखा । रायाचे सन्मुख आनली ।।२३७।। नृप पाहता न्याहाळून । शामचिन्ह पडद्यातून । पाहता तो क्रोधायमान । चित्रकाराने पाहिले त्यासी ।।२३८।। गूढार्थ तो समजला । भूपति त्यान विनविला । राया देवी प्रसन्न मला । बारीक सेला तिळचिन्ह ।।२३९।। ते ऐकता वचन सत्य । राजा संतोष हृदयात । दानमानेन वस्त्रार्पित । मम कन्या अद्भुत गुणी ।।२४०।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org