________________
६७२ : आराधना कथाकोष
क्रोधनेत्र अरे रे पोरा । कुवर म्हणे रे गवारा । अहो जाहो हो हे वैखरा । नम्रोत्तरा काहो बोला ना ॥२१७।। त्याचे ऐकोनी नम्रोत्तर । नृपातुल्य दिसे कुवर । केले परस्पर जुहार । रूप सुंदर संतोषले ॥२१८।। येवोनी सांगती रायासी । राजा संतोषला मानसी । पत्र पाठविले तयासी । यावे गावामी चतुराइन ।।२१९।। नदी न मार्ग न रात्र । न वहन न पायी न सूत्र । न भुकी न भोजन न नीर । यावे चतुर ऐशा रीती ।।२२०॥ ते पाहोनिया कुशलता । विचार करी ज्ञानयुक्ता । रथ संजोगी त्या वरौता । सीडातौता सांक बांधिले ॥२२१।। हस्ती जुंपुनिया रथात । अपन बैसला सिक्यात । सक फुटाणे घे वोटीत । चूळ भरीत पानियाने ।।२२२॥ न जेवला न भुकेला । न तान्हेला ना पानी पेला । न मार्गाला न अडमार्गाला राजगृहीला पाहे नैनी ।।२२३।। न क्षिति तो न ग्रामांतर । अर्धबिंबी ना दिनकर । रायासी श्रुत हे चतुर । सभा समग्र आनंदली ।।२२४॥ आनंदेभेरी राय दिली । सर्व नर नारी चालली । नेक वाद्ये वाजती भली । सर्व मिळली एकवट ।।२२५।। बाहेर आले लोक समग्र । अभयकुमार जैसा चंद्र । कुळदीपक तो खींद्र । पाहे राजेंद्रानं दअश्रु ॥२२६॥ न गादी न सिंहासनावरी । न नटं न तो अलंकारी । अंगरक्षक मध्ये तरी । पाहे नेत्री त्या श्रेणिकराव ।।२२७।। कुळी दीप महा चतुर । सर्वं आनिला अलंकार । गजारूढ वाद्यगजर । हर्ष समग्र नारीनरा ।।२२८।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org