________________
प्रसंग अठ्ठेचाळीसावा : ६७१
ब्राम्हण पुसे कुवरासी । न कळता सांगे मातेसी । अभयमती म्हणे पुत्रासी । व्याघ्र लांडग्यासी आनावे || २०५ ।। एडक्यासन्निध बांधावे । खायासी पुष्कळ घालावे । जथा तथा तोलुनी द्यावे । श्रेणिकराव संतोषती ।।२०६ || राय धाडियले कोहळ । घागरीत घाली कोवळ । नित्य घालावे याते जवळ । पूर्ण सकळ द्यावे आम्हा || २०७|| न देतीची ग्राम घेईन । ऐस ऐकताची ब्राम्हण | कुमरापासी ते येवोन लोटांगण उच्चारिताती ॥२०८॥ कुमर म्हणे ब्राह्मणासी । हे काय सांगता आम्हासी | पीडा आली रे गावासी । जाउ वेगेसी आम्ही त्वरा ।।२०९ || ब्राह्मण करिती विनय । आम्हासी तुम्ही टाकू नये | हा उगवा आम्हासी स्वय । सांगुन द्यावे दयावंता ।। २१० ।। तेव्हा द्रवला अंतःकरणी । द्विजासी दिधले सांगुनी । वेला घाला पुष्कळ पानी । धुळी घालोनी कुंभ भरा ॥२११॥ तेव्हा ते विप्र आनंदले । तैसेचि राया पाठविले । जितुके तितुके देखिले । राहिले उगले राजेश्री ॥ २१२ ॥
मग विचारूनिया मनी । आता पाहू तयाची करणी | द्वैदूत पाठविले गुणी | कोन ज्ञानी पाहोनी यावे ॥ २१३ ॥ जासूद गेले अतित्वरा । ते हिंडले नगर सारा । मग ते आले नदीतीरा । खेळत्या पोरासी पाहिले ॥ २१४॥
1
जंबुवृक्षावरी कुमर । जांभुळ भक्षिती सुंदर । आम्हासी द्यारे आरे पोर घ्यारे गवार उष्ण कि शीत ।।२१५ ॥ जांबुळ टाकिता क्षिताक्षितीत । मृत्तिका जाली त्यात लिप्त । फुंकून खाता म्हणे त्यात । तोंड पोळत मिशा जळती ||२१६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org