________________
६७० | आराधना कथाकोष
नंदिग्रामासी जाल येण । तव तेथे पूर्वी श्रेणिकान | ब्राम्हण गर्विष्ठ दंडीन | अन्याय पाहून तयाचा ।।१९३।। एक पत्र पाठविल त्यासी । मिष्ट भृंगार विहिरीसी । न पाठविता तुम्हासी । दंडीन अवध्यासी जानावे ।। १९४ ।। पत्र वाचिताची ब्राम्हण । भयभीत ते अवघे जन । विचार करिता बैसोन । नानावचन बोलताती ॥ १९५ ॥ त्या न समजता विचार । तेथे तो अभयकुमर । पृच्छा करीतसे चतुर । बुधीप्रकर सांगे तथा ।। १९६ ।। तयाचे ऐकोनी वचन | आनंदले अवघे जन ।
चतुर पाठवा ब्राम्हण । रायाकारण विनती करा ।। १९७ ।। तो जाउनिया सभेप्रती । श्रेणिकरायासी विनंती ।
कूप रुसला न ये म्हणति । ते मागती स्त्री प्रभुराया ।। १९८ । पुरुषान स्त्री पाहोनिया । विषयलुब्ध येति ठाया । विहीर द्यावी करा दया । प्रेमच्छाया गरीबावरी ।।१९९ ।। मौन राहिला राजेश्वर । कोणी ब्राम्हण आहे चतुर । मग पाहे तो दुजा विचार । गज तोलुनी द्यावा त्वरे ॥ २०० ॥ ते पाहोनिया द्विजराये । कुमरा म्हणे करा साह्ये । न सांगताची दंड होय । द्यावे अभय नामसार ॥ २०१ ॥ कुमर म्हणे आना नाव । त्यात घालावा तो गजराव । खुने पाषाणात तो लावे | मोजून द्यावे बरोबर ॥ २०२ ॥ राजा धरी मौन वदना । विचारिता अपुल्या मना । विप्र मूर्ख नसे शाहणा । कोन्ही पाहुणा आला असे ||२०३|| एक अजा अनिला बरा । नंदीगावा धाडिला त्वरा । यासी घाला पुष्कळ चारा । बरोबरा तोलून द्या ।।२०४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org