________________
प्रसंग अठ्ठेचाळीसावा : ६६९
अनुपम जिनमंदिर | पाहोनी संतोष अंतर | म्हणे हे कृत्य करणार | दाखवा नजर माझिया ॥। १८१ ।। श्रेणिक येवोनी त्वरित । म्हणे कर्ता श्री अरिहंत । पाहिला ज्ञानी रूपवंत । सुमित्राकन्येत द्यावे यासी ॥। १८२ ॥ विधियुक्त सुलग्न केले । पूर्वपुण्य सुख भोगिले । राजगृही काय जाहले । ते श्रवण केले पाहिजे ॥१८३॥ उपश्रेणिक गुरू अग्र | धर्म द्विधा ऐके समग्र । वैराग्य उत्पन्न अनुग्र । घेऊन उग्र तप करू ।। १८४।।
राज्यपट् चिलाईतासी । दीक्षा घेतली गुरूपासी । करिती आत्मसार्थं कासी । न शोभे राज्यासी चिलाईत ।। १८५ ।। प्रधाने श्रेणिकासी पत्र | धाडिले वेगे दूत सूत्र ।
वाचिता करे नीर नेत्र । हृदयमंत्र स्त्रीसी सांगे ॥ १८६॥
अहो तुम्ही सगुण स्त्रिया । राजगृह पांडुकुटिया । आम्हा त्वरा असे जावया । त्या निर्दयासी निर्धाटीन ।। १८७॥ राज्यभार त्वरा घेवोनी | राजगृह सन्निधाग्रणी । चिलाईत गेला पळोनी । प्रधान येवोनी भेटले || १८८ ।। राज्ये स्थापिला श्रेणिकराव । चैत्यालयासी महोत्सव | राजनीति महावैभव | पुण्यप्रभाव मानवासी ॥ १८९ ॥ येरीकडे अभयकुमार । मातेस पुसे समाचार | पिता आमचा सांगा त्वरे । त्याविना क्षणभर न गमे ॥ १९०॥ सुमित्रा ते अभयमती । पुत्रा ऐकावे भो सन्मती | पांडुकुटी राजगृहांती । राज्य करिती तव जनिता ॥ १९९ ॥ ते ऐकोनिया उतावळे । जावे म्हणे तो सकुमाळ । सर्वा पुसे क्षेमकुल । निघे तत्काळ कुटुंबेसी ॥ १९२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org