________________
६६८ : आराधना-कथाकोष
थोडे जळ करि क्षालन । उरल प्यावे अवघे जन । धर्मवंत महाजैन । दया पालन करावे ।।१६९।। मोती वाकडे असे छिद्र । सूत्र शर्करा केवी भद्र । अभयमती मुखचंद्र । पाहोनी नरेंद्र वरिला ।।१७०।। विधियुक्त विवाह जाला । पूर्वपुण्य सूर्य उदेला । पुण्यवान सुखे जाहला । भोगू लागला सर्व सुख ।।१७१।। अथ कवने एके दिसी । सोमश्रमा परिवारेसी । वनक्रीडा करिता त्यासी । जिनदत्त ऋषी देखिले ॥१७२।। नमोस्तु केला अवघेजन । धर्म ऐकिला तो संपूर्ण । सर्व सुखाचे कारण । वैराग्य उत्पन्न द्विजासी ॥१७३।। गुरू अग्रे दीक्षा अंगीकार । आतापयोग तप तीत्र । आयुष्यांती स्वर्गमंदिर । सौधर्म सुर धर्मयोग ।।१७४।। तस्मात् अगत्य पुण्येन । श्रेणिकासी सुखसंपन्न । अभयमती स्त्रियारत्न । पुत्ररत्न अभयकुमार ।।१७५।। महासुभट चर्म अंगी । ज्ञानी आनि धर्मानुरागी। भावि मोक्षस्त्री पद लागी । तत् पुण्यालागी कोन वर्णी ॥१७६।। तत् राजा कांचीपुरात । वसुपाळ तो गुणवंत । जिनमंदिरी दर्शनार्थ । पाहिले तेथे जीर्णालय ।।१७७।। सोमशर्मा ब्राह्मणास । कार्य सांगितले त्यास । जीर्णोद्धार करावयास । न्यावे द्रव्यास त्वरा करा ।।१७८।। तत् द्विजपुत्र तो अज्ञान । न कळे तया कृतकारण । श्रेणिक बुद्धिचा प्रवीण । केला जीर्णोद्धार अनुपम ।।१७९।। पंच कल्याणाची पूजा । वाद्ये वाजती ऐके राजा । देखिली सिंहचिह्न ध्वजा । चालला राजा दर्शनासी ॥१८०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org