________________
प्रसंग अठ्ठेचाळीसावा : ६६७
प्रथम त्याची भेट जाली । मामा वदे हे काय बोली । जिव्हेचा रथी बैसोनी चाली । छाये धरिली छत्ती त्याने ॥१५७॥ इत्यादिक ते दहा प्रश्न । कन्ये सांग तू ज्ञान नयन । बापास त्याचि विधात्यान । मामाभिधान तुम्हासी दिले ।। १५८।। जिन नाम कथा श्रवण । तोचि रथ पथि जानन । छत्री धरली वृक्षातळी । मळमूत्र वांघोळी उफराट्या ॥१५९॥ ग्राम वस की आहे वस्ती । ज्या ग्रामी देव गुरू असती । पूजा दान शास्त्राची युक्ती । भोजन तृप्ती त्या ग्रामात ।। १६० । नदीत मोचे चढउन । पदि पद्म ते राजचिन्ह | मार्गी चाले हाति धरोन । जीवदयेने श्रावकमार्ग ।। १६१ ।। पुढे ग्रामात एक नारी । बंधकी मोकळी विचारी । पतिव्रता ते दुराचारी । प्रेत नजरी पाहे पुढे || १६२।। हे मेले किंवा हो जिवंत । अपकीर्ती सुकीर्ति जयवंत । पुढे पाहता एक शेत । भक्षिल त्यात ऋण घेता ।। १६३ ।। प्रश्न होताच संपूर्ण । व्याकुळ झाली मदनान | मग आपन सावरून । बाबा नयन तो दाखवी ।।१६४ ।। नदीतीरासी वदे पिता । दासी पाठविली त्वरिता । मोगरेलनखा अतौत । चातुर तो निपुणमति ।। १६५ ।। पाहोनी स्वरूपाचा हेळी । मदन व्याकुळ ते जाली । कर्णाची खून दाखविली । सांगितली वार्ता सर्वही ।। १६६ ॥
वाई तुमचे पूर्वपुण्य । रूपगुणे तो धन्य धन्य । ऐकताची मदनबाण | उचंबळून धीर धरी ॥१६७॥ तत् परीक्षा पाहावयासी । कर्दम करवी मार्गासी । अल्प नीर क्षालनासी । गुप्तरूपेसी झरूक्यात ।। १६८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org