________________
६६६ : आराधना-कथाकोष
रूप अनुपम पाहिला । पूर्वपुण्य योग जाला । बोलता चातुर्ये चांगला । संतोषला निजमानसी ॥१४५।। तेव्हा श्रेणिक बोले त्यात । मामा जिह्वेचा करा रथ । मज बैसवोनि तयात । चालता पंथ सिनहारे ।।१४६।। तो म्हणे स्वरूप चांगला । वेडा दिसतो अंतराला । पुढे जाता वृक्ष देखिला । छाया बैसला छत्रीधारी ।।१४७।। तेथोनि चालता पुढती । पुसे ग्राम वस की वस्ती । भोजन करावया यथास्थिति । ग्राम पुढती असे की नसे ॥१४८।। नदीत जल पसरून । मोचे चढविले तयान । पथि चाले हस्ती धरून । तो ग्राम नयन देखिला ।।१४९।। तेथ देखली एक नारी । भ्रतारासी ते ताडन करी । बघा की मुक्त हे सुंदरी । ऐकता अंतरी सत्यवेडा ॥१५०।। तेव्हा मृत प्रेत देखिले । हे आता मेल की वाचले। पुढे शेत एक देखिले । रक्षण बैसले कुणंबी ॥१५१।। मामा हे भक्षिल कि भक्षिती। ऐकोन कंटाळलो चित्ती । रूपवान राजस कांती । गहिला चित्ती भासतसे ॥१५२॥ असो ते आले कांचीपुरा । श्रेणिक राहे नदीतीरा । ब्राम्हण आला तो मंदिरा । कमळनेत्रा पाहे कन्या ।।१५३।। पिता पाहला हर्षे बुधी । मनी म्हणे मत् कार्यसिद्धी । बैसउनि यथाविधि । बाप्पा फारही श्रम जाले ।।१५४।। पिता म्हणे गे बुधीवंते । बटु देखिला रूपवंत । परि तो गहिला भासत । मार्गी जल्पत भलतैसा ॥१५५।। त्याचे ऐका वेडेचार । ऐकोनिया प्रश्न समग्र । तो म्या ठेविला बाहेर । नदीचे तीर तिष्ठतसे ।।१५६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org