________________
६७६ : आराधना-कथाकोष
बाई म्हणे ते पुण्यवान । आता न लगे येन जाणे । कुश्चळदेहे अग्निदहन । संस्कार करन आता याचा ॥२६५॥ म्हणोनी आनी अग्निभेळा । भडभडा निघती ज्वाला । ते पाहाता घेती तत्पळा । ध्यान अचळ कैसे त्या ॥२६६॥ राजा कोपला ते पाहोनी । तयासी बोले प्रिय राणी । स्वामी ऐका शांत होवोनी । गुरूची करणी तुमच्या ।।२६७।। देहे ठेउनीया वो पथ । वैकुंठी बसले ध्यानस्थ । पुनरपि येवोनी येथ । संसारी दुःखिस्थ होतील ।।२६८।। म्हणोनी पर उपकार । करावा देह संस्कार । क्रोध शांतता राजेश्वर । कथांतर दृष्टान्त ऐका ।।२६९।। वत्स देश महाविख्यात । कौशांबी पत्तन अते त्यात । प्रजापाळ ऐश्वर्यवंत । सुखी नांदत पूर्वपुण्य ॥२७०।। तेथे श्रेष्ठी सागरदत्त । वसुमती स्त्री गुणवंत । तेथे एक समुद्रदत्त । भार्यायुक्त समुद्रदत्ता ॥२७१॥ तयोर्द्वयो स्नेह बहुत । धर्म आचरत निहिंसा त्यक्त । वचन प्रमाण बोलत । होता संतत दोध व्याही ॥२७२॥ काळे पुत्र कन्या जाहली । दोघानी लग्नही चांगली । दोघ यौवनभरा आली । किं गती जाली ऐका राया ॥२७३।। रात्रौ दिव्य नरदेह प्राप्त । दिवा भुजंग पेटारीत । ऐसे दुगड भोग भोगीत । संसारी रात विचित्र राया ॥२७४|| तथा त्या समुद्रदत्ताच । नागदत्ता कन्या सुरस । तिचा रूपगुण विशेष । एकमेकास विचारिती ॥२७५॥ त्या नागदत्ता वासुमित्रान । विधियुक्त जाल लग्न । वाचादत्त नाही चळन । वचन मरन सत्यराया ॥२७६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org