________________
६६० : आराधना-कथाकोष तेव्हा श्री जिनदासश्रावक । ब्रह्मदत्त आनि जैन लोक । पंच नौकार कथानक । यक्षनायक मारू पाहे ॥७७।। तदा उत्तर कुरू यक्षेन । तत् आसन कंपायमान । अनावृत्त यक्ष येऊन । गुप्त होऊन बैसला तो ॥७८|| तो पापी क्रोधयुक्त मनी । मारू पाहे तो शस्त्रपाणी । क्रोधे जिनयक्ष तत्क्षणी । चक्रेण मूनि उडविली ॥७९॥ तो काळदेव महापापी । वैर साधीन म्हणे कोपी। पूर्वपुण्यान विघ्नसोपी । वडवानळापि टाकिला तो ।।८०॥ लक्षुमी दिव्य देवांगण । धार्मिका बैसवी शासना। पूजा करिती विधी नाना । सर्वही जना आनंद पै ।।८।। सम्यग्दर्शन ते सार । पाळिती शहाणे चतुर । ते पूजनीक क्षितिवर । निरंतर दृढ सम्यक्त्वी ।।८२।। तेव्हा तो जिनदास गुणी । येता झाला आपुले स्थानी । न्हवनपूजा जिनसद्मनि । षड्रस भोजनी सर्व तृप्त ।।८।। पुण्यवानाचे मंदिरासी ! स्वामी आले भावरीसी । प्राप्त नवविध पुण्यासी । मग मुनीसी प्रश्न केला ॥८४॥ गुरू अवधिज्ञान नेत्ने । सर्व सांगे ते वैरसूत्र । पूर्वभवीचा वादी तो मित्र । ज्ञानेन मात्र कर्मबंध ।।८५।। ऐसे जानोनी भव्यजन । शुद्धत्रय करा दर्शन । जेन प्राप्त मोक्षसदन । सुखसंपन्न मोक्षवासी ।।८६॥ श्लोक:-त्रिभुवनैकहितं शिवकारणं शुचितरं प्रभजंतु सुदर्शनं । परमसौख्यकृते सुबुधोत्तमाः । किमिहचान्यमहाश्रमकारणैः ॥८७॥
॥ इति दर्शन कथा ११४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org