________________
प्रसंग अठ्ठेचाळीसावा : ६५९
धर्मानुराग धरी चित्ती । उपसर्ग साहे शास्त्रयुक्ती । सोळा भावना भावि मती । आयुष्यांती त्या परलोक ||६६ ॥ अहो पंडित आना मना । भव विचित्र जीव नाना । त्रिभुवनी उत्तम जाना । सोळा भावना तीर्थजन्म ॥ ६७ ॥ श्लोक :- स जयतु मुनिनाथो भूरिकष्टं सुजित्वा । संपदि लकुचनामा प्राप्तवान् शर्मसारं । गुणगणमणिरुद्रो बोधिसिंधु प्रसादो । जिनपतिहिम रश्मिः प्रोल्लसत् - रश्मीयोगात् ||६८|| ऐशा कथा शतत्रिदश ( ११३ ) | पुढे चित्त द्यावे कथेस । दर्शनच्यवन आख्यानास । हृदय मादुस ठेवावे ।।६९।। पाटलीपुर नगर विख्यात । तेथे तो श्रेष्ठी जिनदत्त । सदाचारी सद्गुरूभक्त । दर्शनयुक्त परमेष्ठिचे ॥ ७० ॥ जिनदासी तयाची भार्या । जिनदासपुत्र गुणवर्या । व्रतधारी विपनक्रिया । भक्ती आचार्या तत्पर || ७१|| एकदा जिनदास गुणी । सुवर्णद्वीपा चालला वाणी । धनमेळवाया लागुनी । समुद्रजीवनी जहाजात ॥७२॥ पूर्ववैरी व्यंतर कुदेव । काळाख्य असे त्याचे नाव | ते पाहोनी समुद्री नाव | जिनदासासव चालतु ॥७३॥ व्यंतर म्हणे जिनदासासी । देव कोण सांग आम्हासी । जिनमत नाही या भूमीसी । मृत्य पावसी न सांगता ॥ ७४ ॥ त्यान ते ऐकोनिया सर्व । रे रे पापी कुज्ञान गर्व | आमचा जिन देवाधिदेव । रुखबदेव वर्धमान ॥७५॥ त्या देवासी नमस्कार । केवळज्ञानाचा तो भास्कर । तत् वचनोक्त मतांतर । त्रिभुवनी थोर वर्तती ॥७६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org