________________
६५८ : आराधना-कथाकोष
राजपुत्र तो तत्क्षणी । जाउनी ठाके रणांगणी । रिपु काळमेघ जिंतुनी । आला घेवोनी पितृपासी ।।५४।। करभार घेवोनी सोडला । लकुचो विषयांध जाला। परस्त्रीची इच्छा मनाला । पुसे बापाला द्याहो आज्ञा ॥५५।। पुत्र कुबुधी दुराचारी । बलाढये म्हणे न भय धरी । चित्ता येईल ते तू करी । पापभारी परस्त्रियचे ।।५६।। गावात हिंडे घरोघर । शीलभंग करी तो फार । पापी चांडाळ राजपुत्र । स्त्रिया बाहेर न निघती ॥५७|| तेथे पुंगल एक जैन । नागधर्मा त्याची कामीन । तयासी आसक्त दुर्जन । ते भ्रतारान पाहिले ।।५८।। तदा पुंगलोपि श्रावक । क्रोधाग्नी हृदयी धडक । राजपुत्राचा हृदि दाहक । काही विवेक विचारितु ॥५९।। शीलवंती ते कामीनास्त्री । गृहीगुप्त त्या दिनरात्री । तदा तो राजपुत्र मंत्री । वनक्रीडाधात्री सैन्यासी ।।६।। पूर्व पुण्य होत पदरी । गुरू भेटले वनांतरी । निश्चयान नमोस्तु करी । धर्म सागारी अनगार ॥६१।। गुरू उपदेश ऐकोन । पापासी भ्याला तो जैन । अंतरी वैराग्य उत्पन्न । दीक्षाग्रहण दिगंबरी ॥६२।। तेरा प्रकाराच चारित्र । सोळाकारण व्रत पवित्र । उज्जनी नगरीचे धात्र । जन्मभूमी मात्र पहावी ॥६३॥ महाकाळ वना आतौता । कार्योत्सर्गी क्षितिवरौता । पुंगले ऐकोनिया वार्ता । वैर चित्ता उद्भवला त्या ॥६४।। रात्रौ जावोनिया वनात । लोहे खिळे खिळले त्यात । मुनी उभे हृदयी शांत । परीषह साहत बावीस ।।६५।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org