________________
प्रसंग अठेचाळीसावा : ६५७
जीव अनादि असे सिद्ध । सुख दुख न जाने भेद । पाप पुण्य कर्म विविध । प्रपंच अगाध जीव भ्रमे ।।४२।। जरी जीव पुण्यकार । तरी तो मुक्तीचा भ्रतार ।। ब्राह्मण ऐकिल समग्र । वैराग्ये त्वरे मागे दीक्षा ॥४३।। दीक्षा घेवोनी घोर तप । तोडिला कर्माचा संताप । मति श्रुती अवधी व्याप । जपजाप्ये अचळ ध्यानी ॥४४॥ जिंती उपसर्ग कठीण । बावीस परीषह साहून । आयुष्यांती स्वर्गी जाऊन । जाला उत्पन्न महद्धिक ।।४५'। तो जीव श्रेणिका उदरी । अभयकुमर पुण्यपरी। मोक्षगामी एकावतारी । मोक्षपायरी लाधेल तो ।।४६।। जिनदत्त तो वसुमित्र । तप करोनी घोरांदर । आयुष्याती स्वर्गमंदिर । महद्धिकेंद्र सौधर्मी ते ॥४७॥ मनानुरागरतकथा । भावानुरागकथा श्रोता । पुढे पहावे ग्रंथप्रपंचा । मोक्षाचे माथा जावयासी ।।४८।। श्लोक :-विशुद्धकेवळज्ञानं लोकालोकप्रकाशकं । नमस्कृत्य जिनं वच्मि कथां धर्मानुरागजां ॥४९।। केवळ वाक्य शुद्धज्ञान । ज्ञानेच होय मुक्तिस्थान । त्याहासी करोन नमन । धर्मानुरागेन सांगु कथा ॥५०॥ अवंती देश तो विख्यात । महापुरी उज्जनी त्यात । राजा धनवर्मा पुनीत । धनस्त्री रत राजभार्या ॥५१॥ तयासी कुमर उत्पन्न । लकुचो नाम बलवान । शत्रुजना धाक दाउन । मानाभिमान रणांगणी ॥५२।। एकदा काळमेघ राजा । म्लेच्छ उन्मत्त बोले पैजा । करभार घेईन मी वोजा । पीडितो प्रजा दुष्टबुद्धी ॥५३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org