________________
प्रसग अठ्ठचाळासावा : ६६१
श्लोक-नमस्कृत्य जिनं देवं-देव देवेंद्रवंदितं ।। सम्यक्त्वामुक्तकाख्यानं द्वितीयं रचयाम्यहं ।।८८।। श्रीजिनेंद्रदेवागमन । सरस्वती मुखी उत्पन्न । जे सम्यक्त्वमुक्त आख्यान । करावे श्रवण मोक्षार्थी ॥८९।। लाट देश सुविख्यात ते । गलगोद्रहपटनात । श्रावक तो श्रीजिनदत्त । कामिनी त्यात जिनदत्ता ।।९।। तयासी कन्या जिनमती । रूपसौभाग्य गुणवंती । पूर्वपुण्य शीलसंपत्ती । देव पूजिती अरिहंत ॥९१।। तेथे दुसरा असे जैन । नागदत्त त्या अभिधान । नागदत्ता त्याची कामीन । पुत्र उत्पन्न रुद्र तो ॥९२॥ जिनदत्ता तो नागदत्त । कन्या द्यावी मम पुत्रात । तत्पुत्र मिथ्यामतिरत । नउ त्यात गुणशालिनी ॥९३॥ तथा तो नागदत्त कुधी । रुद्रदत्त प्रपंचबुधी। गुप्ताचार्य मुनी समाधी । सुविद्या साधी कामातुर ॥९४।। सत्यार्थी होउनिया धूर्त । कन्या परनिली विधीयुक्त । पुनः चालती बौधमत । वज्र मिथ्यात ऐशापरी ॥९५।। रूद्रदत्त म्हणे सुंदरी । मम धर्म तू अंगिकारी। सार धर्म गे माहेश्वरी । कर्णद्वारी मंत्र सांगतो ॥९६।। जिनमती म्हणे देहधनी । धर्म विख्यात त्रिभुवनी । जिनकीर्त्त महापुराणी । त्यात टाकुनी मिथ्या नेघे ।।९७।। तुम्ही टाकोन मिथ्यामत । जैनधर्म आत्महित । घेवोनी करा सार्थकात । मोक्षपंथ स्वधर्मे होय ।।९८॥ ऐसा प्रतिवाद करिती । स्वस्वधर्म आचरताती। सुधबुधी ते जिनमती। देवगुरूभक्ती त्रिशुद्ध ॥९९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org